'स्तनांचा आकार वाढवण्यासाठी मला..', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'सगळेच हे..'

Pressured To Get A Boob Job Done: एकेकाळी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री मागील अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने नुकताच एक खुलासा करताना इंटरनेटवर आपलं वय कमी दाखवण्यात आलेलं त्यात मी सुधारणा केली, असं सांगितलं. इतक्यावरच ती थांबली नाही तर तिने करिअरमध्ये सर्वोच्च स्थानी असताना तिला आलेले अनुभवही शेअर केले आहेत.

| Jun 11, 2024, 12:18 PM IST
1/11

Sameera Reddy On Boob Job

अभिनेत्री समीरा रेड्डीने नुकताचा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. हा फोटो 17 वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजेच आज 45 वर्षांची असलेली समीरा 28 वर्षांची असतानाही कशी दिसत होती हे या फोटोतून लक्षात येतं. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

2/11

Sameera Reddy On Boob Job

"लोक म्हणता आता मी फार आनंदी आणि निवांत दिसते. मी 28 वर्षांची असतानाही अधिक रेखीव दिसतायचे. मात्र आता वयाच्या 45 व्या वर्षी मी अधिक प्रेमळ असून असून कम्फर्टेबल झाले आहे," असं समीरा म्हणाली.  

3/11

Sameera Reddy On Boob Job

तसेच इंटरनेटवर आपलं वय चुकीचं दाखवलं जात असल्याचंही समीराने म्हटलं आहे. "मी जेव्हा 40 वर्षांची होते तेव्हा इंटरनेटवर 38 वर्ष दाखवलं जात होतं. मात्र ते वय मीच बदललं कारण मी 40 वर्षांची झाल्याचा मला अभिमान आहे. मुलाखतींमध्ये मी एवढं काय काय सांगितलं की गुगलने माझं वय कमी दाखवलं होतं,"असं समीरा मस्करीत म्हणाली.

4/11

Sameera Reddy On Boob Job

समीराने ती अभिनय क्षेत्रात सक्रीय होती तेव्हा तिला अनेकदा शरीरामध्ये बदल करण्यासाठी शस्त्रक्रीयांची मदत घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचं सांगितलं. "मी माझ्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना माझ्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी शस्रक्रीया करण्यासाठी माझ्यावर जो दबाव टाकण्यात आला होता तो मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही एवढा होता," असं समीराने सांगितलं.

5/11

Sameera Reddy On Boob Job

"सगळे लोक मला भेटल्यावर म्हणायचे की, 'समीरा सगळेच जण हे करत आहे तर तू का नाही करुन घेत?' मात्र मला माझ्या शरिरामध्ये असलं काही असावं असं वाटत नव्हतं," असंही समीराने सांगितलं. आपण योग्य व्यक्तींबरोबर असल्याने आपण कधीच अशी शस्रक्रीया करुन घेतली नाही, असा खुलासाही समीराने केला.

6/11

Sameera Reddy On Boob Job

"तुम्ही तुमच्यातले दोष लपवत आहात असा तो प्रकार होता. मात्र हा काही दोष नाही. यालाच आयुष्य म्हणतात असं मला वाटतं. ज्यांनी प्लास्टीक सर्जरी केली किंवा बिटॉक्स ट्रीटमेंट घेतात त्याच्याबद्दल मी चुकीचा विचार करत नाही. मात्र माझ्यासाठी मी आतून स्वत:ला बदलणं अधिक महत्त्वाचं वाटतं," असं समीराने सांगितलं. 

7/11

Sameera Reddy On Boob Job

समीरावर सध्या इन्स्टाग्रामवरुन कौतुकाचा वर्षाव सुरु असला तरी तेव्हा तिने हे माध्यम हाताळण्यास सुरुवात केली तेव्हा तिला अनेक सल्ले दिले गेले. ज्यामध्ये फोटो पोस्ट करण्याआधी अधिक फिल्टर्स वापरण्याचा सल्लाही होता. "मात्र मी माझं वजन, माझी त्वचा आहे तशी दाखवणार. मी जशी आहे तशी आहे. मी जे काही करतेय त्याने समाधानी आहे. उगाच मी 36-24-26 फिगरमागे धावत नाही," असंही समीराने म्हटलं आहे.  

8/11

Sameera Reddy On Boob Job

"मी अभिनेत्री म्हणून काम करताना जशी आहे तशी कधीच लोकांसमोर येण्याची संधी मिळाली नाही. इथे मला मी आहे तशी लोकांसमोर येण्याची संधी मिळतेय. मी अभिनेत्री होते तेव्हा माझ्यात आणि चाहत्यांमध्ये कायम एक पडदा असायचा. तेव्हा आम्हाला जे सांगितलं जायचं ते करावं लागायचं, आता तसं नाहीये," असंही समीरा म्हणाली.  

9/11

Sameera Reddy On Boob Job

"मी रोज झोपेतून उठते तेव्हा इतरांप्रमाणेच अस्ताव्यस्त असते. मी माझ्या मुलांमागे त्यांच्या तयारीसाठी धावत असते. मात्र मला हे वयाच्या 45 व्या वर्षी करता येतंय यासाठी मा फार समाधानी आहे. मी वयाच्या 45 व्या वर्षीही छान दिसतेय," असं समीरा म्हणाली.  

10/11

Sameera Reddy On Boob Job

"जेव्हा तुम्ही तुमचे पिकलेले केस, सुटलेलं पोट अन् त्वचेवरील सुरकुत्या दाखवता तेव्हा असेही काही जण असतात जे हे पाहून आपल्यासारखं कोणीतरी आहे असा विचार करुन समाधानी होतात आणि त्यांच्यावरील ताण कमी होतो," असं म्हणत समीराने आहे तशीच सर्वासंमोर येण्यास आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं.   

11/11

Sameera Reddy On Boob Job

समीरा आता दोन मुलांची आई असून ती तिच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत असते. बऱ्याचदा ती पती आणि मुलांबरोबरचे भटकंतीचे फोटो शेअर करत असल्याचं पाहायला मिळतं.