Ishan Kishan: ....म्हणून मी रणजी खेळू शकत नाही; बीसीसीआयसोबतच्या कथित वादावर इशानने सोडलं मौन

गेल्या काही दिवसांपासून इशान किशन आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वाद असल्याचं चित्र दिसून येतंय. मात्र अशा परिस्थितीत इशानने बीसीसीआयला चोख उत्तर दिलंय.

Surabhi Jagdish | Feb 22, 2024, 12:02 PM IST

Ishan Kishan: गेल्या काही दिवसांपासून इशान किशन आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वाद असल्याचं चित्र दिसून येतंय. मात्र अशा परिस्थितीत इशानने बीसीसीआयला चोख उत्तर दिलंय.

1/7

इशान किशन टीम इंडियापासून दूर असून त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेतली होती. मानसिक आरोग्याचं कारण त्यावेळी इशानने दिलं होतं. 

2/7

यानंतर इशान माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांच्या अकदामीमध्ये सराव करताना दिसला आणि बीसीसीआयसोबतचा त्याचा वाद वाढ गेला. दरम्यान यावर आता इशानने मौन सोडलं आहे.  

3/7

यानंतर इशान माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांच्या अकदामीमध्ये सराव करताना दिसला आणि बीसीसीआयसोबतचा त्याचा वाद वाढ गेला. दरम्यान यावर आता इशानने मौन सोडलं आहे.  

4/7

इशान किशन म्हणाला की, "सध्याच्या मी फलंदाजीच्या काही तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करतोय. जेणेकरून मला माझ्या फलंदाजीचे तंत्र अधिक विकसित करता येईल. 

5/7

मी फलंदाजीच्या तंत्रावरच लक्ष केंद्रीत केलं असून मी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार नसल्याचं मला वाटतंय, असंही इशानचं म्हणणं आहे. 

6/7

मी रणजी क्रिकेट स्पर्धेतही खेळू शकत नाही. सध्याच्या घडीला मी टी-20 क्रिकेटच्या दृष्टीने माझ्या सरावाची आखणी केली असून त्यानुसारच मी आता अभ्यास करत असल्याचं किशनने म्हटलंय.

7/7

त्यामुळे आता टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये इशानच्या नावाचा विचार केला जाणार का, हे पहावं लागणार आहे.