Ajinkya Rahane: अखेर अजिंक्य रहाणेच्या आयुष्यात 'तिची' एन्ट्री, फोटो व्हायरल

Ajinkya Rahane: टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे रहाणेच्या घरी एका पाहुणीचं आगमन झालं आहे.

Surabhi Jagdish | Feb 22, 2024, 10:51 AM IST
1/7

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये महागड्या गाड्यांचा छंद नवीन नाही आणि हा ट्रेंड सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली यांच्या काळापासून सुरु आहे.

2/7

सध्या अजिंक्य रहाणे टीम इंडियातून बाहेर आहे. अशाच परिस्थितीत त्याने एक महागडी कार खरेदी केलीये.

3/7

रहाणेने त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक नवीन आलिशान कार जोडलीये. ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

4/7

रहाणेने जर्मन कंपनी मर्सिडीजची SUV, Maybach GLS 600 खरेदी केली आहे. मुंबईतील या 5 सीटर एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 3.50 कोटी रुपये आहे.

5/7

अजिंक्य रहाणेने पांढऱ्या रंगाची ही सुपर कार खरेदी केली आहे.

6/7

रहाणेच्या आधी स्टार फलंदाज विराट कोहलीने 2022 मध्ये ही कार खरेदी केली होती. मात्र काही महिन्यांनंतर त्याने ती गाडी विकली. 

7/7

रहाणे सध्या रणजी ट्रॉफीच्या सिझमनध्ये मुंबईकडून खेळतोय. टीम इंडियातून बाहेर असलेल्या रहाणेचा या ठिकाणीही खेळ चांगला होत नाहीये.