Honda City ला टक्कर देणार Hyundai Verna! जबरदस्त लूकसह 5 फोटो पाहा

2023 Hyundai Verna: नवीन पिढीची जबरदस्त Hyundai Verna ची प्रतीक्षा संपली आहे. दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Hyundai ने भारतात नवीन Verna (2023 Hyundai Verna Launch) लॉन्च केली आहे. बाजारात त्याची स्पर्धा नवीन 2023 Honda City, Skoda Slavia, Volkswagen Virtus आणि Maruti Suzuki Ciaz सोबत आहे.

Mar 21, 2023, 15:03 PM IST

.

1/5

कार चार प्रकारात उपलब्ध

कार चार प्रकारात उपलब्ध

नवीन वेर्ना EX, S, SX आणि SX (O) या चार ट्रिममध्ये ऑफर केली आहे. दोन पेट्रोल इंजिन पर्याय आहेत - 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल (113.4bhp, 144Nm) आणि 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन (158bhp, 253Nm). 

2/5

ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय

ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय

नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल आणि iVT गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. तर टर्बो पेट्रोल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअलसह 7-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. ही कार 20.20kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

3/5

कारची किंमत किती?

कारची किंमत किती?

1.5L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन प्रकाराची किंमत 10.89 लाख ते 16.19 लाख रुपये आहे तर 1.5L टर्बो-पेट्रोल व्हेरियंटची किंमत 14.83 लाख ते 17.37 लाख रुपये आहे. या किंमती प्रास्ताविक आहेत.

4/5

नवीन वेर्णामध्ये ADAS ऑफर

नवीन वेर्णामध्ये ADAS ऑफर

नवीन वेर्णामध्ये ADAS ऑफर करण्यात आली आहे. या अंतर्गत, यात अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल विथ स्टॉप अँड गो, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अव्हॉइडन्स असिस्ट, लेन कीप असिस्ट, लेन फॉलोइंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, हाय बीम असिस्ट आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक कोलिजन अवॉयडन्स असिस्ट यांसारखी 17 फीचर्स आहेत.

5/5

2023 Hyundai Verna

2023 Hyundai Verna

यात अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत, जसे की ड्युअल-डिस्प्ले, जे कनेक्टेड फील आहे. यापैकी एक 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे आणि दुसरी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे. कारमध्ये 8-स्पीकर बोस साउंड सिस्टीम, नवीन टच-आधारित तपमान नियंत्रण पॅनेल, ड्रायव्हर अॅडजस्टेबल पॉवर सीट,  व्हेंटिलेटेड आणि हिट फ्रंट सीट देण्यात आली आहे.