Riva Arora Audi Car: 13 वर्षाच्या रिवा अरोराला 44 लाखांची ऑडी कार गिफ्ट, चाहते म्हणाले "लायसन्स आहे का?"

Riva Arora Audi Car: 13 वर्षीय अभिनेत्री रिवा अरोराला (Riva Arora) 44 लाखांची नवी कोरी ऑडी कार (Audi Car) मिळाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) तिने आपल्या या नव्या गाडीचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. नुकतेच इन्स्टाग्रामवर (Instagram) तिने 10 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला असून, तिच्या आईने ही कार तिला गिफ्ट दिली आहे.   

Mar 21, 2023, 14:42 PM IST
1/6

13 वर्षीय अभिनेत्री रिवा अरोरा इन्टाग्रामवर चांगलीच प्रसिद्ध आहे. नुकतंच इन्स्टाग्रावर तिने 10 मिलियनचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने तिच्या आईने तिला 44 लाखांची ऑडी कार गिफ्ट केली आहे.   

2/6

रिवा अरोराने इन्स्टाग्रामला आपल्या नव्या गाडीचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. गाडी आणण्यासाठी रिवा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने हातात 10 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्यानिमित्ताने आकडे दर्शवणारे फुगेही आणले होते.   

3/6

नव्या गाडीसह फोटो शेअर असताना रिवा अरोराने ही पोस्ट शेअर करण्यात थोडा उशीर झाल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सचे आभार मानले आहेत.   

4/6

रिवा अरोराने इन्स्टाग्रामला आपल्या नव्या गाडीसह फोटो शेअर केल्यानतंर चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे.   

5/6

काही चाहत्यांनी तिला गाडी घेतली, पण तुझ्याकडे चालक परवाना आहे का? अशी विचारणा केली.   

6/6

रिवा अरोराने 'उरी' चित्रपटात भूमिका निभावली होती. तसंच रकुल प्रीतसह 'छत्रीवाली' चित्रपटात ती दिसली होती. गतवर्षी आपल्या वयाने बऱ्यात मोठ्या असणाऱ्या करण कुंद्रासह रोमँटिक रिल शूट केल्याने तिच्यावर बरीच टीका झाली होती. तसंच 45 वर्षीय मिकासह एका रोमँटिक व्हिडीओत दिसल्याने नेटकऱ्यांनी तिला सुनावलं होतं.