लसूण सोलायची कटकट विसरा, आता फक्त 1 मिनिटांत सोलून होईल ढीगभर लसूण, वापरा सोपी ट्रिक

लसूण हा स्वयंपाकातील एक महत्वाचा पदार्थ आहे. लसणाची फोडणी घातली की जेवणाची चव द्विगुणित होते. मात्र तसं असलं तरी लसूण सोलणं हे फार किचकट काम आहे. अनेकदा एक लसूण सोलायला जवळपास 10 मिनिटं लागतात, तसेच बोटांच्या नखांमध्ये लसूण सोलल्यावर जळजळ सुद्धा होते. तेव्हा तुम्हाला लसूण सोलण्याची एक अशी ट्रेक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही ढीगभर लसूण अवघ्या काही मिनिटांमध्ये सोलू शकता. 

| Nov 21, 2024, 12:09 PM IST
1/7

लसूण झटपट सोलला जावा यासाठी तुम्ही 2 मिनिटांसाठी लसूण पाण्यात भिजवून ठेवा. परिणामी लसूण हा मॉईश्चरमुळे फुलून येईल आणि त्याची साल अगदी सहज वेगळी करता येईल. 

2/7

लसूण अगदी सहज सोलायचा असेल तर तुम्ही मायक्रोव्हेव्ह किंवा तव्याचा वापर करू शकता. मायक्रोव्हेव्हमध्ये 30 सेकंदांसाठी लसूण ठेवा, असं केल्यावर लसणाची साल अगदी सहज निघते. किंवा तुम्ही तव्यावर काहीवेळ लसूण भाजून त्याची साल वेगळी करू शकता. 

3/7

लसूण सहज सोलायचा असेल तर तुम्ही सुरीने लसणाचे मोठे काप करा यामुळे लसणाची साल आपोआप वेगळी होईल.   

4/7

लसूण सोलण्यासाठी धार असलेल्या सुरीचा वापर करा. यामुळे लसणाची साल पूर्णपणे निघून जाईल, तसेच लसणाची साल काढण्यासाठी दगडाचाही वापर करू शकता. दगडाने लसूण ठेचा यामुळे साल सहज वेगळी करता येईल. 

5/7

लसूण सोलण्याची अगदी सोपी पद्धत म्हणजे एका डब्यात लसणाच्या पाकळ्या टाकून झाकण बंद करून वर खाली हलवा. यामुळे सहज लसणाची साल वेगळी होतील. किंवा लाटण 2 ते 3 वेळा लसणाच्या पाकळ्यांवर फिरवा यामुळे साल सहज निघून जातील. 

6/7

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. यामुळे रक्त गोठण्यापासून प्रतिबंधित होते. लसूणमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात ज्यामुळे गॅस, ॲसिडिटी, पोटदुखी सारख्या समस्या दूर होतात.   

7/7

लसणातील पोषकतत्व :

लसणामध्ये तांबे, फॉस्फरस, प्रथिने, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी, बी6, मँगनीज, कॅल्शियम, सेलेनियम, फायबर अशी पोषकतत्व असतात. रिकाम्या पोटी लसणाच्या सेवनाने सुद्धा आरोग्याला अनेक फायदे मिळतात.