Private Part black patch: प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करणं आता शक्य...या सोप्या टिप्स करतील मदत

Dark Patches on Underarms Thighs Private Part : बाजारात प्रायव्हेट पार्टवरील काळपटपणा दूर करण्यासाठी अंक क्रीम्स, लोशन उपलब्ध आहेत पण त्याचा अतिरेक केलात तर त्वचा आणखी खराब होऊ शकते त्यामुळे कुठल्याही जाहिरातींना भुलू नका. 

Jan 10, 2023, 13:39 PM IST

Private part black patches: आजकाल बऱ्याच महिला एका समस्येमुळे हैराण आहेत आणि ती समस्या म्हणजे नाजूक भागावरील काळपटपणा. मासिक पाळी (menstrual cycle) आणि नाजूक भागावरील ओलसरपणा यामुळे तिकडचा भाग काहीवेळा काळपट पडू लागतो. पण हे काही वेळा इन्फेक्शन सुद्धा असू शकते त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता काम नये. वेळीच डॉक्तरांचा सल्ला घेणं केव्हाही उत्तमच. पण आज आपण जाणून घेऊया घरच्या घरी काही उपायांनी आपण हा काळपटपणा कसा दूर करू शकतो.(How To Get Rid of Dark Patches on Underarms Thighs Private Part Home Remedies Marathi

1/5

चंदन पावडर काळ्या पडलेल्या मांड्या (black thighs) आणि प्रायव्हेट पार्टची जागा यावर रामबाण म्हणजे चंदनाची पावडर. हायपरपिगमेंटेशनची  (hyperpigmentation)समस्या चंदनामुळे दूर होऊ शकते, ही पेस्ट काळ्या पडलेल्या त्वचेवर लावा 20  मिनिटे ठेऊन द्या आणि धुवून टाका. 

2/5

साखर एका वाटीत एक चमचा साखर , लिंबाचा रस , मध एकत्र करा हे मिश्रण मंदीच्या आतील भागात लावा . सुकल्यांनंतर हलक्या हाताने मसाज करा यावेळी थोडं पाणी वापर आणि धुवून टाका.

3/5

दूध दूध उत्तम क्लींजर आहे हे आपल्याला माहीतच आहे.काळ्या पडलेल्या जागेवर कच्च दूध लावा हलक्या हातानी मसाज करा १५ मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ करा.   

4/5

बटाटा बटाट्याचा रस काढून घ्या हा रस प्रायव्हेट पार्टवर 15  मिनिटांसाठी लावून ठेऊन द्या आणि मग कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. 

5/5

पपई पपईमध्ये ‘पपाइन’ नावाचं एन्झाईम (papain enzyme in papaya) असते.त्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळ होऊ शकते  पपईची पेस्ट करावी आणि नाजूक भागावर लावावी अर्धा तास ठेऊन कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या, याने नक्कीच फरक पडेल.