Dustbin colors and uses: हिरव्या,निळ्या,पिवळ्या रंगाचे डस्टबिन कशासाठी वापरतात? जाणून घ्या

तुम्ही कधी कधी ही गोष्ट नोटीस केलीये का, सकाळी आपल्या घरी जेव्हा सफाई कर्मचारी (swachh bharat abhiyan) कचरा गोळा करण्यासाठी येतात तेव्हा त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे डस्टबिन असतात

Jan 10, 2023, 13:19 PM IST

swachh bharat mission:  स्वच्छता किती महत्वाची आहे हे कोरोना (corona) काळात आपण सर्वानींच चांगलं अनुभवलं आहे, आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही पूर्णतः आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, आजूबाजूला सर्व स्वच्छ असेल तर, काम करताना आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. भारत सरकारसुद्धा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेवर भर देण्यात आग्रही आहे आणि त्या अंतर्गत अनेक मोहीम देखील राबवल्या जात आहेत. 

1/5

काळा डस्टबिन : बायोमेडिकल वेस्ट (biomedical waste) टाकण्यासाठी काळ्या रंगाच्या डस्टबीनचं वापर केला जातो. जस की, सॅनिटरी नॅपकिन (sanitary napkin) , बेबी डायपर, एक्सपायरी झालेले मेडिसिन्स , ब्युटी प्रोडक्ट्स फेकण्यासाठी कला डस्टबिन असतो. 

2/5

ओला कचरा जस कि उरलेलं जेवण, भाज्यांच्या साली, वापरलेली चहा पावडर ,खराब झालेली फळं, फुलं हे सगळं काही हिरव्या रंगाच्या डस्टबीनमध्ये टाकलं जात. 

3/5

पिवळ्या रंगाचे डस्टबिन: स्किन टिश्यू (skin tissue), बाळाची नाळ (umbilical cord) , मलमपट्टी किंवा ड्रेसिंग केलेला कापूस इत्यादी फेकण्यासाठी करतात.

4/5

लाल डस्टबिन: पॅथॉलॉजी (pathology) आणि ऑपरेशन थियेटर (operation theatre) मध्ये वापरल्या जाणाऱ्या आणि वापरून झालेल्या गोष्टी लाल रंगाच्या डस्टबिन मध्ये टाकल्या जातात. रक्ताच्या पिशव्या (blood bags), युरीन बॅग्स (urine bags) सिरिंज, आयव्ही सेट (iv sets) सारख्या गोष्टींचा समावेश आहे. 

5/5

निळा डस्टबिन: सुका कचरा फेकण्यासाठी निळ्या रंगाच्या डस्टबिनचा वापर केला जातो.