इंस्टाग्रामवर मोफत ब्लू टिक कशी मिळवायची? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

 कोणत्याच कॅटेगरीत येत नसेल आणि इन्स्टाग्रामवर मोफत ब्लू टिक मिळवायची असेल तर काय करायचे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Jan 21, 2024, 10:58 AM IST

Free Blue Tick on Instagram: कोणत्याच कॅटेगरीत येत नसेल आणि इन्स्टाग्रामवर मोफत ब्लू टिक मिळवायची असेल तर काय करायचे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

1/10

इंस्टाग्रामवर मोफत ब्लू टिक कशी मिळवायची? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

How to get free blue tick on Instagram learn step by step method

Free Blue Tick on Instagram: कधीकाळी फेसबुकवर असणारे युजर्स आता  इंस्टाग्रामवर शिफ्ट झालेयत. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सना आपला स्टेट्स दाखवण्यासाठी अनेकांना ब्लू टिक हवीशी वाटते. पण त्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने अनेकांचा हिरमोड झालाय.

2/10

दोन मार्ग

How to get free blue tick on Instagram learn step by step method

अनेकांना इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवायची असते पण प्रत्येकाला ब्लू टिक मिळू शकत नाही. इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिले पैसे देऊन आणि दुसरे विनामूल्य आहे. तुम्ही पैसे न भरताही इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळवू शकता, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

3/10

पब्लीक फिगर

How to get free blue tick on Instagram learn step by step method

इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवणे सोपे नाही, हे सर्वात आधी समजून घ्या. इन्स्टाग्राम पब्लीक फिगरला ब्लू टीक देते. तुम्ही प्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी, ब्रँड किंवा संस्था असाल तर तुम्हाला ब्लू टिक मिळू शकते. 

4/10

ब्लू टिकसाठी काय करायचे?

How to get free blue tick on Instagram learn step by step method

या कोणत्याच कॅटेगरीत येत नसेल आणि इन्स्टाग्रामवर मोफत ब्लू टिक मिळवायची असेल तर काय करायचे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

5/10

अकाऊंटची माहिती

How to get free blue tick on Instagram learn step by step method

इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या इन्स्टा अकाऊंटची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. तुमचे नाव, बायो आणि प्रोफाइल फोटो अपडेटेड ठेवा. तुमचा बायो स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवणे आवश्यक आहे.

6/10

नियमितपणे पोस्ट

How to get free blue tick on Instagram learn step by step method

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नियमितपणे पोस्ट टाकायला हव्यात. यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचाल. पोस्टमध्ये चांगले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत जा. 

7/10

अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह ठेवा

How to get free blue tick on Instagram learn step by step method

तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट सतत अॅक्टीव्ह ठेवा. दुसऱ्या पोस्टवर कमेंट करणे आणि लाईक करणे, इन्स्टा स्टोरीवर लोकांचे मत मागणे अशा अ‍ॅक्टीव्हिटी करु शकता. 

8/10

प्रोफाइल अधिक माहितीपूर्ण

How to get free blue tick on Instagram learn step by step method

इंस्टाग्राम प्रोफाइल अधिक माहितीपूर्ण बनवल्यास फॉलोअर्स वाढतील. इतर सोशल मीडिया प्रोफाइलच्या अकाऊंट लिंक कार, तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी लिंक प्रोफाइलवर दिसू द्या. 

9/10

अप्लाय करा

How to get free blue tick on Instagram learn step by step method

हे सर्व अपडेट करुन झाल्यावर इंस्टाग्रामवर ब्लू टिकसाठी अर्ज करा. इन्स्टाग्राम अॅपवरील प्रोफाइलवर जा. नंतर "सेटिंग्ज" वर टॅप करा. यानंतर अकाऊंट पर्यायावर जाऊन रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनवर क्लिक करा. 

10/10

नावापुढे दिसेल ब्लू टीक

How to get free blue tick on Instagram learn step by step method

ब्लू टिकसाठी अर्ज करताना तुम्हाला अकाऊंट डिटेल्स द्यावी लागेल.  तुमचे नाव, बायो आणि प्रोफाइल फोटो, अशी माहिती अपडेट ठेवा. यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि 24 तासांच्या आत तुम्हाला ब्लू टीकबद्दल कळवले  जाईल. तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर ब्लू टिक मिळेल आणि तुमच्या नावापुढे दिसू लागेल.