कशाला पाहिजे CA...आता थेट WhatsApp वरुन फाईल करा ITR; जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया

ऑनलाइन टॅक्स फायलिंग प्लॅटफॉर्म ClearTax ने एक नवी सेवा WhatsApp आधारित ITR फायलिंग सर्व्हिस लाँच केली आहे.   

Jul 22, 2024, 19:13 PM IST

ऑनलाइन टॅक्स फायलिंग प्लॅटफॉर्म ClearTax ने एक नवी सेवा WhatsApp आधारित ITR फायलिंग सर्व्हिस लाँच केली आहे. 

 

1/10

तुम्ही WhatsApp वरुनही आयकर परतावा भरु शकता.   

2/10

ऑनलाइन टॅक्स फायलिंग प्लॅटफॉर्म ClearTax ने एक नवी सेवा WhatsApp आधारित ITR फायलिंग सर्व्हिस लाँच केली आहे.   

3/10

ही सुविधा त्यांच्यासाठी फार फायदेशीर आहे ज्यांना आयटीआर फाईल करताना फार अडचणींचा सामना करावा लागतो आणि रिफंडही मिळत नाही.   

4/10

करदाते या सुविधेअंतर्गत ITR 1 आणि ITR 4 फॉर्म भरु शकतात.   

5/10

AI च्या मदतीने तुम्ही या सुविधेचा फायदा घेत आयकर परतावा भरु शकता.   

6/10

कोणताही खासगी करदाता आयटीआर 1 आणि आयटीआर 4 फॉर्म फाईल करु शकतो. ClearTax इंग्रजी, हिंदी आणि कन्नडसह 10 भाषांमध्ये सेवा पुरवत आहे.   

7/10

प्लॅटफॉर्मवर सुरक्षित पेमेंट नोंदणीकृत प्रणाली आहे, जी वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप इंटरफेसमध्ये फाईल करण्यापासून पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू देते.  

8/10

युजर्स सहजपणे इमेज, ऑडिओ आणि टेक्स्टच्या माध्यमातून आवश्यक माहिती जमा आणि सादर करु शकतात, ज्यामुळे डेटा कलेक्शन प्रक्रिया सहज होते.   

9/10

AI बॉट बेस्ड ही व्हॉट्सअप सेवा युजर्सना स्टेप बाय स्टेप प्रक्रियेची माहिती देतं. ज्यामुळे युजर्स विना अडथळा आयकर परतावा भरु शकतात.   

10/10

यासह कोणकोणती टॅक्स व्यवस्था तुमच्यासाठी योग्य आहे, जेणेकरुन तुम्ही जास्तीत जास्त कर वाचवू शकता याबद्दलही सांगतं.