PHOTO: AC च्या रिमोटमध्येच लपलंय लाईट बील वाचवण्याचं बटण! तुम्हाला सापडलं का?

तुमच्या एसीच्या रिमोटमध्ये असे एक बटण आहे, ज्याद्वारे वीज बिल नियंत्रित केले जाऊ शकते. 

Pravin Dabholkar | Sep 03, 2024, 15:20 PM IST

AC Button Hacks For Reduce Electricity Bill: तुमच्या एसीच्या रिमोटमध्ये असे एक बटण आहे, ज्याद्वारे वीज बिल नियंत्रित केले जाऊ शकते. 

1/7

ACच्या रिमोटमध्येच लपलंय लाईट बील वाचवण्याचं बटण! तुम्हाला सापडलं का?

How To Control Electricity Bill In Humidity Utility Marathi News

How To Control Electricity Bill In Humidity: पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे लोकांना त्रास होतो. या हवामानात एअर कंडिशनरच दिलासा देतो. पण एसी जास्त चालवल्यास वीज बिल वाढण्याचंही टेन्शन असतं. काहींना वीज बीलाची आठवण येऊनच घाम येतो. त्यामुळे अनेकजण एसी थोडावेळ चालवून मग बंद करतात. 

2/7

वीज बिल

How To Control Electricity Bill In Humidity Utility Marathi News

पण अशा काही गोष्टी करून तुम्ही वीज बिल बऱ्याच अंशी कमी करू शकता. तुमच्या एसीच्या रिमोटमध्ये असे एक बटण आहे, ज्याद्वारे वीज बिल नियंत्रित केले जाऊ शकते. याबद्दलच्या टीप्स जाणून घेऊया. 

3/7

टायमर लावा

How To Control Electricity Bill In Humidity Utility Marathi News

वीज बिल वाचवायचे असेल तर टायमर लावा. कारण रात्री एसी चालू ठेवून झोपलो तर वीज बिल खूप जास्त येऊ शकते. पण झोपण्यापूर्वी टायमरच्या बटणावर क्लिक करा. काही वेळ एसी चालल्यानंतर खोली थंड होईल. टायमरनंतर एसी बंद होईल आणि तुम्हालाही थंड हवा मिळत राहील.

4/7

एसीचे तापमान

How To Control Electricity Bill In Humidity Utility Marathi News

एसीचे तापमान एक अंशाने वाढल्याने विजेचा वापर सुमारे 6% कमी होतो, असे अभ्यासात असे दिसून आले आहे. तुम्ही AC 24°C वर ठेवल्यास, 20°C वर ठेवण्याच्या तुलनेत विजेचा खर्च 24% कमी होऊ शकतो. आता  AC चे डीफॉल्ट तापमान 24°C असावे, असे BEE ने AC उत्पादकांना सांगितले आहे. पूर्वी ते 20°C होते.

5/7

खोली पॅकबंद आहे का?

How To Control Electricity Bill In Humidity Utility Marathi News

रुम व्यवस्थित थंड होण्यासाठी तुमच्या खोली पॅकबंद आहे का ते पहा. थंड हवा बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी खिडक्या घट्ट बंद करा. खिडक्यांवर पडदे किंवा पट्ट्या लावा जेणेकरून सूर्यप्रकाश आत येणार नाहीत. खोली गरम झाल्यास एसीवर जास्त लोड येतो. रुममध्ये छिद्र नसेल तर थंड हवा संपूर्ण खोलीत समान रीतीने पसरते.

6/7

नियमितपणे स्वच्छ करा

How To Control Electricity Bill In Humidity Utility Marathi News

एसी नियमितपणे स्वच्छ करा आणि त्याची देखभाल करा. यामुळे एसी अधिक चांगले काम करेल. एसीचा फिल्टर नियमित साफ करा किंवा बदला. यामुळे हवेचा प्रवाह वाढेल आणि एसी थंड होईल. तसेच रेफ्रिजरंट लीक होत नाही ना, किंवा एसी खराब होऊ शकेल अशी दुसरी कोणतीही समस्या नाही हे देखील तपासा.

7/7

पंखे देखील खूप उपयुक्त

How To Control Electricity Bill In Humidity Utility Marathi News

पंखे देखील खूप उपयुक्त आहेत. पंख्यामुळे थंड हवा रुममध्ये पसरते. त्यामुळे तुम्ही एसी थोडा कमी केलात तरीही थंड वाटू शकते. एसी आणि पंखा दोन्ही एकत्र चालवल्यास वीज आणि पैशांचीही बचत होते.