तुमच्या तुपात बीफ आहे का? टेस्ट करायला किती खर्च येतो?

How To Chech Purity Of The Ghee : तिरुपतीत प्रसाद म्हणून दिल्या जाणा-या लाडवात प्राण्यांची चरबी, माशांचं तेल वापरल्याचा आरोप केला जातोय. यावरुन राजकारणही तापलंय. जाणून घेऊया तुपाची शुद्धता कशी ओळखायची. 

| Sep 20, 2024, 23:26 PM IST

Tirupati Temple Laddu Has Beef Fat : तिरुपती म्हणजे करोडो हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र.. भगवान व्यंकटेश्वर या नावाने ओळखल्या जाणा-या बालाजीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो लोकं येतात.. महाराष्ट्रातल्या भाविकांची संख्या तर प्रचंड असते.. भाविक बालाजीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून लाडू घेतात.. मात्र आता या लाडूच्या प्रसादावरुन नवा वाद निर्माण झालाय.. तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

1/7

तिरुमलाच्या पवित्र लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. 

2/7

NDDB CALF लॅबमध्ये  तुपाचे नमुने तपासण्यासाठी 8 हजार रुपये आणि 18 टक्के GST अशा प्रकारचे शुल्क आकारले जाते. 

3/7

तुम्ही घरी वापरत असलेल्या तुपात बीफ आहे की नाही याची तपासणी करायची असल्यास तुपाचे नमुने तुम्ही गुजरात येथील NDDB CALF लॅबमध्ये पाठवू शकता.  

4/7

प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी बीफ टॅलो, लार्ड आणि फिश ऑईल वापरलं जात असल्याचं अहवालात म्हटलं गेलंय..

5/7

NDDB CALF लॅबच्या अहवालात तिरुपती लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी वापरल्याचं निष्पन्न झालंय.

6/7

चंद्राबाबू नायडूंनी केलेल्या आरोपांची पुष्टी एका अहवालानेसुद्धा केली आहे. गुजरातमधल्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने लाडवांच्या नमुन्याची पाहणी केली.  

7/7

तिरुपतीच्या लाडवांमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरल्याचा खळबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.