एका लाडू 200 Rs.. तिरुमला तिरुपती देवस्थानची लाडू विक्रीतून होणारी एका दिवसा कमाई किती? आकडा एकदा पाहाच

Tirupati Temple Prasad News : लाडू विक्रीच्या माध्यमातुन तिरुमला तिरुपती देवस्थानची कमाई किती? जाणून घेऊया.     

| Sep 20, 2024, 20:26 PM IST

Tirupati Laddu Revenue: तिरुपतीच्या लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपांमुळे देशात खळबळ उडाली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमार्फत होणारी लाडू विक्री हा चर्चेचा विषय ठरला आहे. जाणून घेऊया लाडू विक्रीच्या माध्यमातुन तिरुमला तिरुपती देवस्थान किती कमाई करते.

1/7

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती  देवस्थान अर्थात तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते.  बालाजीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो लोकं येतात. येथे प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या लाडूंना मोठी डिमांड आहे.   

2/7

तिरुमला तिरुपती देवस्थानकडून दररोज तीन लाख लाडू बनविले जातात. या लाडूच्या विक्रीच्या माध्यमातून देवस्थानाला वर्षाला 500 कोटींचा महसूल मिळतो. तर, दिवसाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. 

3/7

लहान आकाराचे लाडू मंदिरातच भाविकांना प्रसाद म्हणून मोफत वाटले जातात. तर, मंदिराबाहेरील दुकांनमद्ये मध्यम आकाराचे लाडू प्रति नग 50 रुपये आणि मोठ्या आकाराचा लाडू प्रति नग 200 रुपयांना विकले जातात.  

4/7

लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे लाडू विकले जातात. यांचे वजन अनुक्रमे 40 ग्रॅम, 175 ग्रॅम आणि 750 ग्रॅम इतके असते. 

5/7

मंदिराच्या बाहेर अनेक स्टॉल्सवर लाडू विक्री केली जाते. दर्शन घेऊन मंदिराबाहेर येणारे लोक आवर्जून हे लाडू खरेदी करतात.

6/7

 तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD)  मार्फत लाडूचे उत्पादन करण्यात येतं.  विशिष्ट चवीसाठी हे लाडू भारत आणि जगभरातील भाविकांमध्ये प्रसिद्ध आहेत.  

7/7

तिरुपतीला येणारे भक्त प्रसाद म्हणून लाडू घेतात. मात्र आता या लाडूच्या प्रसादावरुन नवा वाद निर्माण झाला. हेच लाडू तिरुपती मंदिराला मोठा महसूल मिळवून देतात.