भारतातील 1600 वर्ष जुन 'नालंदा' विद्यापीठ 700 वर्षांनी नामशेष कसं झाले? पुस्तकं पेटवली, 3 महिने जळत होतं हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ

  जगातील सर्वात मोठं विद्यापीठ भारतात आहे. भारतातील 600 वर्ष जुन 'नालंदा' विद्यापीठ हे भारतातील सर्वाच प्राचीन विद्यापीठ आहे. प्राचीन बौद्ध विद्यापीठात जगभरातून विद्यार्थाी शिक्षण घेण्यासाठी येत होते.  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे.

वनिता कांबळे | Jun 19, 2024, 16:29 PM IST

Nalanda University:  जगातील सर्वात मोठं विद्यापीठ भारतात आहे. भारतातील 600 वर्ष जुन 'नालंदा' विद्यापीठ हे भारतातील सर्वाच प्राचीन विद्यापीठ आहे. प्राचीन बौद्ध विद्यापीठात जगभरातून विद्यार्थाी शिक्षण घेण्यासाठी येत होते.  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे.

1/7

नालंदा विद्यापीठाची स्थापना सुमारे 1600 वर्षांपूर्वी पाचव्या शतकात झाली. म्हणजेच  इसवी सन 427 मध्ये हे नालंदा विद्यापीठ स्थापना करण्यात आले. 

2/7

 12 व्या शतकामध्ये बख्तियार खिलजी याने हल्ला करून विद्यापीठाला आग लावली. 3 महिने जळत हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं. यात अतिशय मौल्यवान, दुर्मिळ ग्रंथ संपदा आगीत जळून खाक झाली.   

3/7

पाचव्या शतकात बांधलेल्या प्राचीन नालंदा विद्यापीठात सुमारे 10 हजार विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. 1500 शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे. विद्यापीठामध्येच विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होती. अशा प्रकारचं हे जगातील पहिलंच विद्यापीठ होतं.  

4/7

गुप्त सम्राटांच्या काळात हे नालंदा विद्यापीठ सुरु झाले. प्रामुख्याने वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, बौद्ध तत्त्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र अशा विषयांचे शिक्षण येथे दिले जायचे.

5/7

1882 साली बिहारच्या स्थानिक लोकांना याठिकाणी बौद्धाच्या मूर्ती आढळल्या. विदेशी इतिहासकारांनी येथे संशोधन केले. यानंतर जमीनीत गाडले गेलेले हे विश्वविद्यापीठ जगासमोर आले. 

6/7

19 व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठाची जगाला ओळख झाली. उत्खननादरम्यान या विद्यापीठाचे अवशेष जगासमोर आले.   

7/7

1600 वर्षापूर्वी नालंदा हे जगातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं. बिहारमध्ये हे विश्वविद्यालय आहे.