रतन टाटांचं 'Middle Class' शॉप; ना जाहिरातीवर खर्च, ना एक पैशाचा डिस्काऊंट; तरीही करते 7000 कोटींची कमाई

या ब्रँडची विशेष बाब म्हणजे ते ना कोणत्या प्रकारची सूट देतात ना कंपनी जाहिरातीवर एकही रुपया खर्च करते.पण यानंतर त्यांच्या शोरुममध्ये ग्राहकांची तुफान गर्दी असते. बिलिंगसाठी तर लोकांची अक्षरश: रांग लागते. टाटाचं हे शोरुम मध्यमवर्गीयांचं तर प्रचंड आवडतं आहे.   

| Sep 10, 2024, 19:05 PM IST

या ब्रँडची विशेष बाब म्हणजे ते ना कोणत्या प्रकारची सूट देतात ना कंपनी जाहिरातीवर एकही रुपया खर्च करते.पण यानंतर त्यांच्या शोरुममध्ये ग्राहकांची तुफान गर्दी असते. बिलिंगसाठी तर लोकांची अक्षरश: रांग लागते. टाटाचं हे शोरुम मध्यमवर्गीयांचं तर प्रचंड आवडतं आहे. 

 

1/8

टाटाचं दुकान

टाटाचं दुकान

सर्वात विश्वासार्ह ब्रँड कोणता असा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा एकाच कंपनीचं नाव प्रत्येकाच्या तोंडी येतं, ते म्हणजे टाटा. सुईपासून ते विमानांपर्यंत अनेक गोष्टी निर्माण करणारी टाटा कंपनीच्या एका ब्रँडबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या ब्रँडची खास गोष्ट म्हणजे ते ना कोणती सूट देतात, ना जाहिरातीवर खर्च करतात. पण यानंतर त्यांच्या शोरुममध्ये ग्राहकांची तुफान गर्दी असते. बिलिंगसाठी तर लोकांची अक्षरश: रांग लागते. टाटाचं हे शोरुम मध्यमवर्गीयांचं तर प्रचंड आवडतं आहे. आपण येथे फॅशन आणि गारमेंट्स ब्रँड Zudio बद्दल बोलत आहोत. 

2/8

ना जाहिरात, ना सूट; तरीही 7000 कोटींची कंपनी

ना जाहिरात, ना सूट; तरीही 7000 कोटींची कंपनी

आम्ही टाटाच्या Zudio बद्दल बोलत आहोत. चांगला दर्जा आणि योग्य किमतीवर लक्ष केंद्रित करून टाटाची ही कंपनी आज 7000 कोटी रुपयांची झाली आहे. Zudio हा एक फॅशन रिटेल ब्रँड आहे, जो टाटा समूह कंपनी Trent.Ltd चा एक भाग आहे. कंपनीचा महसूल 12,375 कोटी रुपये आहे. त्यापैकी एकट्या Zudio ची कमाई 7000 कोटी रुपये आहे. या टाटा ब्रँडने मार्केटिंगऐवजी स्वस्त दरात ग्राहकांना चांगली उत्पादनं देऊन हे यश मिळवले आहे. 

3/8

Zudio हा मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय फॅशन आणि कपड्यांचा ब्रँड आहे. Zudio जाहिरातींवर एक रुपयाही खर्च करत नाही किंवा त्याच्या उत्पादनांवर कोणतीही सूट दिली जात नाही. असं असूनही त्यांनी 7000 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.  

4/8

टाटांचा वेगळा अंदाज

टाटांचा वेगळा अंदाज

फार कमी वेळेत टाटाचा हा ब्रँड लोकप्रिय झाला आहे. टाटाच्या Zudio समोर अनेक मोठ्या ब्रँड्सचं आव्हान आहे. पण आपली वेगळी बिजनेस स्ट्रॅटेजीच्या आधारे कंपनीने लोकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. योग्य किंमत आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून, कंपनीने तोंडी प्रसिद्धी मिळवली आहे. महागड्या जाहिरातींवर होणारा खर्च वाचवून कंपनीने उत्पादनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. लोकांनी त्यांच्यावर इतका विश्वास दाखवला आहे की, देशातील 163 शहरांमध्ये त्यांची 545 दुकाने आहेत. आता दुबईतही Zudio शोरूम  आहे.

5/8

Zudio च्या उत्पादनांची किंमत कमी का असते?

Zudio च्या उत्पादनांची किंमत कमी का असते?

कंपनीची स्वतःची इन-हाउस डिझायनिंग टीम आहे. त्यामुळे त्याचा डिझाइनवरील खर्च कमी होतो. कंपनी अशा ठिकाणी आपले शोरूम उघडते जिथे लोकांना सहज पोहोचणं शक्य होतं. कंपनीचं लक्ष्य डिझायनिंगसह फॅब्रिकच्या गुणवत्तेवरही असतं. या सगळ्याचा फायदा कंपनीला होतो. कंपनी मोठ्या प्रमाणावर उत्पादनावर लक्ष केंद्रित करते. 

6/8

कपडे, शूज आणि विविध ॲक्सेसरीजच्या कमी किमतीत मध्यमवर्गीयांच्या गरजा पूर्ण करण्यात Zudio यशस्वी ठरला आहे, ज्याचा कंपनीला फायदा होत आहे. टाटाच्या व्यावसायिक धोरणाचा हा परिणाम आहे की कंपनी सवलतींशिवाय आणि जाहिरातीशिवायही चांगला महसूल मिळवत आहे.  

7/8

Zudio चे कपडे स्वस्त का असतात?

Zudio चे कपडे स्वस्त का असतात?

वास्तविक कोणतीही कंपनी ड्रेस डिझाईन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. प्रसिद्ध डिझाइनर नियुक्त केले जातात. परंतु Zudio हे करत नाही. यात इन-हाऊस डिझाइन टीम आहे, ज्यामध्ये फॅशन इन्स्टिट्यूटच्या मुलांना काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्याची डिझायनिंगची किंमत कमी होते. 

8/8

याशिवाय कंपनी बल्क मॅन्युफॅक्चरिंग करते. नवीन डिझाईन्ससोबतच बाजारात सध्याच्या डिझाईन्सची कॉपी करून कमी खर्च करून पैशांची बचत होते.