एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात? जाणून घ्या तुमची लिमिट

भारतीय लोकांच्या जेवणात चपातीचा समावेश असतोच. गव्हापासून बनवण्यात येणारी ही चपाती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली ठरते. काहीजण दिवसभरात केवळ २ चपात्या खातात तर काहीजण दिवसभरात ६ पेक्षा जास्त चपात्या सुद्धा खातात. पण तुम्हाला माहितीये का? की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात?    

Pooja Pawar | Oct 08, 2024, 18:45 PM IST
1/6

एका व्यक्तीने दिवसभरात किती चपात्या खायला हव्यात हे विविध फॅक्टर्सवरून ठरवलं जाऊ शकतं. जर की तुमच वय, लाइफस्टाइल, फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक स्वस्थ आणि संतुलित आहार. इत्यादी फॅक्टर्सवरून तुम्ही दिवसभरात किती चपात्या खायला हव्यात याची लिमिट ठरवू शकता. 

2/6

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? :

न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांच्यानुसार एक निरोगी तरुण व्यक्ती दिवसातून जवळपास 5 ते 7 चपात्या खाऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असू शकते. तेव्हा किती चपात्या खाव्यात हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

3/6

फिजिकल ऍक्टिव्हिटी :

 तुम्ही दिवसभरात किती हालचाल करता किंवा तुमची लाईफस्टाईल कशी आहे यावरून तुम्ही दिवसभरात किती चपात्या खाव्यात हे ठरवू शकता. ज्या लोकांची फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त असेल अशा लोकांना जास्त पोषणाची आवश्यकता असते. 

4/6

बॅलेन्स डायट :

चपाती खाण्यासोबत तुम्ही संतुलित आहाराची सुद्धा काळजी घ्यायला हवी. म्हणजे चपाती सोबतच डाळ, भाज्या, प्रोटीन इत्यादींचा आहारात समावेश केला पाहिजे. 

5/6

आजार :

 असे काही आजार आहेत ज्यामध्ये आहारात कमी चपात्यांचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो, कारण तसे न केल्यास पचनामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. 

6/6

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)