हल्ल्याच्या रात्रीआधीही सैफच्या घरी जाऊन आलेला हल्लेखोर? खळबळजनक खुलासा

Saif Ali Khan Attack : 15 जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरी हल्ला झाला. त्या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. अटक केल्यावर चौकशी केली असताना हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला त्याने हल्ला का केला याची माहिती समोर आलेली आहे.   

| Jan 19, 2025, 14:01 PM IST
1/7

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत एका मोठी माहिती समोर आली आहे. आजतकने दिलेल्या एका रिपोर्टनुसार हल्लेखोर एका हाऊसकिपिंग कंपनीत काम करत होता आणि यापूर्वी देखील सैफ आणि करीनाच्या घरी जाऊन आला होता. 

2/7

अभिनेता सैफ अली खानच्या घरी घुसून हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा एका हाउसकीपिंग फर्ममध्ये काम करत होता. सैफ त्याच्या घरी काम करणारा हाउसहेल्प हरिच्या मदतीने कधी कधी हाउसकीपिंग फर्मकडून त्याच्या घराची स्वच्छता करून घ्यायचा.  याच दरम्यान आरोपी मोहम्मद शहजाद हा सैफच्या घरी जाऊन आला होता. 

3/7

मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपी 5 ते 6 महिन्यांपासून मुंबईत राहत होता. इथे तो एका हाउसकीपिंग कंपनीत काम करत होता. पोलिसांनी असं देखील म्हटले की त्यांना वाटतंय की आरोपी पहिल्यांदाच सैफच्या घरी पोहोचला होता. कदाचित याचा उद्देश घरी घुसुन चोरी करणे हाच होता. आता नेमकं काय सत्य आहे ते पोलिसांच्या पुढील अधिक तपासातून समोर येईल.   

4/7

सैफ - करीनाच्या घरी कसा घुसला हल्लेखोर? आज तकने दिलेल्या माहितीनुसार 16 जानेवारीच्या रात्री आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने पाहिलं की बिल्डिंगचा सुरक्षा रक्षक झोपलाय तेव्हा तो ११ व्या मजल्यावर पोहोचला. आरोपी तेथील डक्ट शाफ्टमध्ये घुसला आणि सैफच्या घरी पोहोचला. त्यानंतर आरोपी डक्टमधून सैफ आणि करिनाच्या मुलांच्या खोलीजवळ पोहोचला, तसेच घरात प्रवेश केल्यानंतर तो बाथरूममध्ये लपून बसला होता. 

5/7

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

 मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा वरळीमध्ये राहायला होता. हल्ल्याची घटना घडल्यावर तो ट्रेनने ठाण्याला पोहोचला, ठाण्यात एक बाईक स्वार त्याला घेण्यासाठी आला होता. पोलिसांनी दुचाकीच्या नंबरच्या मदतीने आरोपीला ट्रॅक केलं तेव्हा पोलिसांनी आरोपीला हिरानंदानी इस्टेट जवळील लेबर कॅम्प जवळ असलेल्या झाडसुडपांमधून ताब्यात घेतलं.   

6/7

सैफवर का केला हल्ला ?

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असताना त्याने सांगितले की आरोपीला माहित नव्हते की तो सैफ अली खानच्या घरी घुसला आहे. आरोपी म्हणाला की त्याचा हेतू फक्त चोरी करणं हा होता आणि त्यासाठीच तो घरात घुसला. अचानक सैफ त्याच्या समोर आला आणि आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे अभिनेता गंभीर जखमी झाला. 

7/7

हल्लेखोर बांगलादेशी?

सुरुवातीला आरोपीबाबत असं बोललं जात होतं की तो पश्चिम बंगालचा राहणार आहे. मात्र आता पोलिसांचं म्हणणं आहे की सैफ अली खानवर हल्ला करणारा मुख्य आरोपी बांगलादेशचा राहणारा असू शकतो, त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र आढळून आले नाही. पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले की, आरोपीकडे भारताचे कोणतेही वैध दस्तऐवज सापडलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पासपोर्ट कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची अजूनही कसून चौकशी करण्यात येत आहे.