PHOTO : हॉट योगा क्लास अशी ओळख, लैंगिक शोषणाच्या अर्धा डझनहून अधिक आरोप, कोण आहे हा योगगुरू?

Yoga Trainer Bikram Chaudhary : या योगगुरुचे क्लास हॉट योगा क्लास म्हणून ओळखले जायचे, कारण तो स्टुडिओमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस ठेवायचा. त्यामुळे तो योगा करणाऱ्यांना कमी कपड्यामध्ये योगभ्यासाचे धडे द्यायचा. 

Jun 21, 2024, 15:44 PM IST
1/7

बिक्रम चौधरी, ज्यांनी योगा शिकवला पण या शिस्तीचे तसंच आपल्या देशाचं नाव त्याने बदनाम केलं. महिलांसोबत असे घृणास्पद कृत्य केलं की, आज जग त्याला सर्वात दुष्ट योगगुरू म्हणून ओळखतो. 

2/7

बिक्रमचा जन्म 1946 मध्ये कोलकातामध्ये झाला. 1970 च्या दशकात त्यांनी अमेरिका गाठली आणि कॅलिफोर्निया आणि हवाई सारख्या ठिकाणी योग स्टुडिओ सुरू केलं. त्याने असा दावा केला होता की 26 योग पोझेस स्वतः तयार केल्या आहेत. 

3/7

गार्डियन वेबसाइटनुसार, तो वर्षातून दोनदा शिक्षक प्रशिक्षण सत्र घ्यायचा. ज्यामध्ये सुमारे 400 विद्यार्थी योगा शिकायला जायचे. त्याच्या या योगा क्लासमध्ये मायकल जॅक्सन, डेव्हिड बेकहॅम, मॅडोना, लेडी गागा इत्यादी प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश होता.

4/7

त्याच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर 600 कोटींहून अधिक होती आणि त्यांच्याकडे 43 हून अधिक गाड्या होत्या. पण त्यावर अनेक लैंगिक आरोप झालेत. 

5/7

टाईम मॅगझिननुसार, त्याच्या नावावर 220 देशांतील 720 योग शाळा होत्या. याशिवाय जगभरात त्याचे शेकडो स्टुडिओ आहेत. ऑपेरा डेली वेबसाइटनुसार, एकट्या अमेरिकेत त्याचे 650 स्टुडिओ होते. 

6/7

2013 वर त्याच्यावर अनेक विद्यार्थ्यांनी बलात्काराचा आरोप केला. त्यांच्यावर बलात्काराचे अनेक आरोपानंतर त्याची पत्नी राजश्री चौधरी यांनीही घटस्फोटासाठी अर्ज केला. 6.27 कोटींची भरपाई द्यावी त्याला द्यावी लागली. 

7/7

बिक्रम चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी स्वतःला निर्दोष घोषित केलं असून एका मुलाखतीत त्यांनी सांगितलंय की, मी एक अध्यात्मिक व्यक्ती आहे, त्यांनी कधीही कोणाचे नुकसान केले नाही. रिपोर्ट्सनुसार ते आता 80 वर्षांचे आहेत आणि कॅनडामध्ये योग शिकवतात.