होळीच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलांना द्या खास नावे, भक्त प्रल्हादाप्रमाणे असेल मुलं
Baby Names on Pralhad And Lord Vishnu : होळी किंवा धुळवडीच्या दिवशी मुलाचा जन्म झालास त्याला द्या गोंडस नावे.
दरवर्षी लोक होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. धुलिवंदनच्या एक दिवस आधी होलिका दहन होते. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूच्या भक्त प्रल्हादला मारण्यासाठी, त्याच्या वडिलांनी त्याची बहीण होलिकासह त्याला जळत्या हवनकुंडात बसवले पण प्रल्हाद वाचला. प्रल्हाद हे भगवान विष्णूच्या महान भक्तांपैकी एक मानले जातात.
प्रल्हादचा अर्थ अपार आनंद, आनंद असा आहे. यावेळी होलिका दहन 24 मार्चला तर रंगांची होळी 25 मार्चला आहे. या दोन दिवसांत तुमच्या घरी एखादा छोटा पाहुणा आला तर तुम्ही त्याला प्रल्हादच्या नावाचा अर्थ सांगू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला मुलांसाठी अशी नावे सांगत आहोत ज्याचा अर्थ आनंद किंवा परमानंद असा आहे.