महाराष्ट्रातील Hidden Beach; कोकणातील या सुंदर समुद्र किनाऱ्याचे लोकेशन फॉरेनपेक्षा भारी! इथं होतं चित्रपटांचे शुटींग

 कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला मिठबाव समुद्र बऱ्याच लोकांना माहित नाही. 

Apr 12, 2024, 23:30 PM IST

Mithbav Tambaldeg Beach : महाराष्ट्रात एक असा Hidden Beach आहे ज्याबद्दल फरा कुणाला माहित नाही. कोकणातील या सुंदर समुद्र किनाऱ्याचे लोकेशन फॉरेनपेक्षा भारी आहे. या सुंदर समुद्र किनाऱ्यावर अनेक चित्रपटांचे शुटींग झाले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा समुद्र किनारा आहे. 

1/10

मिठबाव-तांबळडेगचा समुद्र किनारा हा देवगड तालुक्यातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो. 

2/10

क्षितिजाचा विस्तारित लँडस्केप आणि काही अंतरावर विलीन होणारा समुद्र  हे मिठबाव समुद्रकिनाऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे.   

3/10

देवगडपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेला हा समुद्रकिनारा एक अतिशय आकर्षक ठिकाण आहे.   

4/10

 मऊ चमकणारी वाळू आणि निळाशार समुद्र असा अद्भूत नजारा पहायला मिळतो.

5/10

  इथे पर्यटकांची गर्दी फार कमी असते.

6/10

देवगडपासून चार किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा समुद्र किनारा आहे. 

7/10

पुणे ते मिठबाव अंतर 370 किमी आहे.  मुंबई ते मिठबाव 450 किमी इतके आहे. कोल्हापूर - गगनबावडा मार्गे येथे जाता येते. 

8/10

मिठबाव- तांबळडेग समुद्र किनाऱ्यावर अनेक  चित्रपटांचे शुटींग झाले आहे.  

9/10

 तांबळडेगच्या समुद्र किनाऱ्याच्या एका बाजूला डोंगराच्या पायथ्याशी प्रसिद्ध असे गजबा देवीचे मंदिर आहे.  

10/10

 शिरगावला उगम पावणारी अन्नपूर्णा नदी अनेक गावाची तहान भागवून मिठबाव गावातून वाहत जाऊन पुढे तांबळडेगच्या समुद्र किनाऱ्यावर आरबी समुद्राला येऊन मिळते.