हेमा मालिनीचा भलत्याच अभिनेत्यावर जडला जीव; जितेंद्रसोबत जवळपास लागलेलं लग्न, धर्मेंद्रची एंन्ट्री झाली तरी कशी?

Entertainment : धर्मेंद्र यांच्याशी लग्न होण्यापूर्वी हेमा मालिनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रेमात होती. त्या दोघांना लग्न करायचं होतं पण...ही प्रेम कहाणी फार कमी लोकांना माहितीये. 

नेहा चौधरी | Oct 16, 2024, 16:12 PM IST
1/8

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेम कहाणी ही सर्वश्रुत आहे. धर्मेंद्र विवाहित असूनही त्यांनी इस्लाम धर्म स्विकारून हेमा मालिनीशी लग्न केलं. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, धर्मेंद्र यांच्यापूर्वी हेमा मालिनी यांच्या आयुष्यात दुसऱ्याच अभिनेता होता. 

2/8

हनीफ झवेरी आणि सुमंत बत्रा यांच्या पुस्तकाच या प्रेम कहाणीचा उल्लेख आहे. सीता और गीता या चित्रपटात ही प्रेम कहाणी रंगली. तो अभिनेता होता संजीव कुमार...हवा के साथ साथ, या सुपरहिट गाण्याच्या वेळी हेमा आणि संजीव यांचा अपघात झाला. तेव्हा त्या दोघांनी एकमेकांची जास्त काळजी वाटली, कारण ते प्रेमात पडले होते. 

3/8

हेमा मालिनी जेव्हा कधी संजीव कुमार यांच्या घरी आईला भेटायला जायचे, तेव्हा हेमा डोक्यावर पदर घ्यायच्या. संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांना लग्न करायचं होतं. पण संजीव कुमार यांना घर सांभाळणारी बायको हवी होती. तर हेमा मालिनी यांना करिअर करायचं होतं. बस मग त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले. 

4/8

'दुल्हन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. खरंतर धर्मेंद्रनाही हेमा मालिनी आवडत होती. तेव्हा धर्मेंद्र यांनी जितेंद्र यांना आपल्या मनातील गोष्ट हेमा मालिनी यांना सांगण्यासाठी पाठवलं. पण झालं काही वेगळंच, जितेंद्र यांनी आपल्या प्रेमाची कबुली हेमा मालिनीसमोर दिली. 

5/8

ही गोष्ट धर्मेंद्र यांना कळली, तेव्हा त्यांनी जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा कपूर यांना सांगितलं आणि त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पण थांबा गोष्ट इथेच थांबत नाही. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमाबद्दल हेमा मालिनी यांच्या आई वडिलांना कळलं. 

6/8

धर्मेंद्र हे विवाहित असून चार मुलांचे वडील होते. अशा मुलाशी आपल्या मुलीने लग्न करायला नको, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे हेमा मालिनीच्या वडिलांनी चेन्नईमध्ये जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न लावायचं ठरवलं. पण ही बातमी धर्मेंद्र यांना समजली आणि ते चेन्नईत पोहोचले. तिथे त्यांनी लग्नात तमाशा केला आणि हेमा मालिनी जितेंद्र यांच्याशी लग्न मोडलं. 

7/8

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हेमा मालिनी यांच्या आईला हेमा यांचं लग्न दक्षिणेतील अभिनेते गिरीश कर्नाड यांच्याशी झालं पाहिजे, अशी इच्छा होती. कारण त्यांना कायम दक्षिण भारतीय जावई हवा होता. हे लग्न झालं पाहिजे म्हणून हेमा मालिनी यांच्या आई जया चक्रवर्तींनी अनेक युक्त्या केल्या होत्या. 

8/8

या सगळ्यानंतर हेमा आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमाचा विजय झाला. या जोडप्याने 1980 मध्ये लग्न केलं.