फॅटी लिव्हरवर मात करण्यासाठी दररोज करा 'ही' पाच योगासने, यकृत होतील निरोगी

यकृतामुळं अन्न पचन होण्यास मदत होतो. तसेच शरीराला उर्जादेखील देते. जर एखाद्या व्यक्तीच्या यकृतातील चरबीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले तर त्याला फॅटी लिव्हर असे म्हणतात. यकृतामध्ये साठलेली चरबी कमी करता येते. नैसर्गिक पद्धतीने तुम्ही फॅटी लिव्हरवर नियंत्रण मिळवू शकता. काही योगासनांच्या मदतीने तुम्ही फॅटी लिव्हरवर नियंत्रण मिळवू शकता. 

Aug 21, 2023, 12:19 PM IST
1/6

फॅटी लिव्हरवर मात करण्यासाठी दररोज करा 'ही' पाच योगासने, यकृत होतील निरोगी

health tips Yoga Asanas To Cure Fatty Liver in marathi

फॅटी लिव्हरमुळं तुम्हीही त्रासलेले आहात का. याचे मुख्य कारण आहे तळलेले पदार्थ, मसालेयुक्त आहार आणि अनहेल्दी फॅट्सचे अतिप्रमाणात सेवन. यामुळं यकृताला सूज येणे किंवा फॅटी लिव्हरची समस्या वाढते. योगासनांच्या माध्यमातून तुम्ही ही समस्या मुळांपासून नष्ट करु शकता. योगासने लिव्हरवर दाब निर्माण करतात त्यामुळं यकृत मजबूत होते व हळूहळू त्याचे कार्य सुधारते. योग यकृत डिटॉक्स करते. जाणून घेऊया फॅटी लिव्हरसाठी कोणते योगासने करणे फायद्याचे ठरेल. 

2/6

अर्ध मत्स्येन्द्रासन

 health tips Yoga Asanas To Cure Fatty Liver in marathi

हे योगासन यकृतासाठी खूपच फायदेमंद मानले जाते. कारण या योगमुद्रेत यकृतावर दबाव निर्माण होतो. ज्यामुळं फायब्रोसिस, एपोप्टोसिस, सूज आणि तणाव यामुळं हानी झालेले यकृत मजबूत होते. 

3/6

गोमुखासन

health tips Yoga Asanas To Cure Fatty Liver in marathi

ही योगमुद्रा लिव्हर सिरोसिसवर रामबाण उपाय आहे. सगळ्यात बेस्ट आसन आहे. जर तुम्हाला लिव्हर सिरोसिसची समस्या असेल तर हे आसन तुम्ही जरुर केले पाहिजे. यकृतातून विषारी पदार्थ आणि रोगजन्य बॅक्टेरिया बाहेर टाकण्याबरोबरच चरबी घटवण्यासही हे आसन मदत करते. 

4/6

धनुरासन

health tips Yoga Asanas To Cure Fatty Liver in marathi

धनुरासन लिव्हरला मजबूत बनवण्याबरोबर डिटॉक्स करण्यासही मदत करते. हे आसम खूपच सोपे आहे. यामुळं शरीरातील चरबी घडते आणि फॅटी लिव्हरची समस्याही कमी होते. त्याचबरोबर यकृतावर दाब पडतो. त्याचबरोबर पाचनतंत्र स्वस्थ ठेवण्यासही मदत होते. 

5/6

शलभासन

 health tips Yoga Asanas To Cure Fatty Liver in marathi

शलभासन पोटाच्याबरोबरच लिव्हरच्या समस्यांसाठीही फायदेमंद आहे. हे आसन केल्यामुळं पोट आणि हातांना बळकटी येते. तसंच, यकृतही डिटॉक्स होण्यास मदत होते. त्याचबरोबर यकृताच्या मांसपेशी देखील मजबूत करते. 

6/6

मलासन

health tips Yoga Asanas To Cure Fatty Liver in marathi

मलासन हे आसन यकृताला आतून मजबूत करते. हे आसन लिव्हरवर दाब निर्माण करते आणि चबरी घटवण्यास मदत करते. त्याचबरोबर शरीरात जमा झालेली चरबी घटवून मेटाबॉलिजम वाढवते. त्यामुळं फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होत नाही.