Health Tips: कांदा खाण्याचा हा आहे मोठा फायदा? असा खाल्ला तर आरोग्य राहिल ठणठणीत

Health Tips: कांदा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या.

Oct 06, 2022, 08:32 AM IST

Best Way To Eat Onion: कांदा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धतही जाणून घेतली पाहिजे. (Health Tips) कांद्यामध्ये व्हिनेगर मिसळल्यास ते शरीरासाठी दुप्पट फायदेशीर ठरु शकते. अशा कांद्याचे सेवन हृदयापासून ते पचनाच्या समस्यांपर्यंत सर्व प्रकारच्या आजारांवर फायदेशीर ठरते. व्हिनेगर केलेल्या कांद्यामध्ये जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात आढळतात. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहासारखे खनिजे असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. व्हिनेगरमध्ये बुडवलेल्या कांद्यामध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.

1/6

कांद्यामध्ये व्हिनेगर मिसळल्यास ते शरीरासाठी दुप्पट फायदेशीर ठरु शकते. व्हिनेगर केलेला कांदा बनवण्यासाठी कांदा मधोमध कापून त्यात व्हिनेगर आणि पाणी मिसळा. नंतर त्यात मीठ टाकून खा. व्हिनेगरसह कांदा देखील चवीला स्वादिष्ट असतो आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो.

2/6

कांद्याचे व्हिनेगरसोबत सेवन करणे हृदयासाठी फायदेशीर ठरते. बेड कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन बी 9 आणि फोलेट असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

3/6

एका संशोधनानुसार, कांदा व्हिनेगरमध्ये बुडवून खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. अशा कांद्याचे सेवन केल्याने प्रोस्टेट, ब्रेस्ट आणि कोलन कॅन्सरचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

4/6

रोगांशी लढण्याची शक्ती वाढवायची असेल तर व्हिनेगरसोबत कांद्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे सर्दी-तापाचे आजार लवकर होत नाहीत. एखाद्याला रोगांशी लढण्याची शक्ती मिळते, ज्यामुळे ते लवकर बरे होतात.

5/6

व्हिनेगरसह कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असल्याने ते पचनासाठी फायदेशीर आहे. हा कांदा खाल्ल्याने अतिसार, बद्धकोष्ठता आणि अपचन या समस्या दूर होतात.

6/6

व्हिनेगरसह कांदा रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करतो. त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. व्हिनेगरसोबत कांद्याचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.