रात्री झोपण्याचा 'परफेक्ट टाइम' कोणता? संशोधकांनी सांगितली सर्वात योग्य वेळ; अनेक समस्या होतील दूर

Perfect Time To Sleep At Night: तुम्ही रात्री किती वाजता झोपता? झोपी जाण्याची तुमची वेळ ठरलेली आहे की नाही? आता हे असे प्रश्न वाचून तुम्ही 'एवढं नियोजन कोण करतं झोपायचं' असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण झोपेची योग्य वेळ कोणती आहे? या प्रश्नाला ठोस उत्तर नाही असं म्हणता येणार नाही. कारण संशोधकांनी झोपेची योग्य वेळ शोधून काढली आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

| Feb 28, 2024, 15:26 PM IST
1/8

Perfect Time To Sleep At Night

योग्य वेळ न झोपल्यास म्हणजेच झोपेच्या वेळ न पाळल्यास अनेक आजारांचा धोका असतो. अपुऱ्या झोपेमुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.  

2/8

Perfect Time To Sleep At Night

मात्र रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? झोपी जाण्याचा असा कोणता परफेक्ट वेळ असतो का? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. मात्र यासंदर्भात सन 2021 मध्ये एका संशोधनाचा अहवालसमोर आला होता.

3/8

Perfect Time To Sleep At Night

युनायटेड किंग्डममध्ये 88 हजार वयस्कर व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाच्या अहवाल सादर करम्यात आला असून या अहवालामध्ये रात्री 10 वाजता झोपायला जाणं फार फायद्याचं ठरु शकतं असं म्हटलं आहे.

4/8

Perfect Time To Sleep At Night

वैज्ञानिकांनी दावा केला आहे की रात्री 10 वाजता झोपणं हे आरोग्यासाठी अगदी योग्य असतं. याला झोपण्याचा परफेक्ट टाइम असं म्हणता येईल. इतर अनेक अहवालांमध्ये 10 ते 11 वाजेदरम्यान झोपणं फायद्याचं ठरतं असं म्हटलं आहे.  

5/8

Perfect Time To Sleep At Night

क्लिवलॅण्ड क्लीनिकच्या अहवालामध्ये रात्री 10 ते 11 दरम्यान झोपणं आरोग्यासाठी फायद्याचं असतं असं मानलं जातं. मात्र याला मॅजिक नंबर म्हणता येणार नाही. प्रत्येकाचं आरोग्य आणि आरोग्यानुसार त्याची झोपीची गरज वेगवेगळी असते.   

6/8

Perfect Time To Sleep At Night

मात्र सर्वसामान्यपणे निरोगी राहण्यासाठी झोपेची वेळ पाळणे आवश्यक आहे, असं सर्वच अहवाल सांगतात. रोज ठरवलेल्या वेळेत जेवणंही तितकेचं महत्वाचे असते. वेळेत जेवण्याचेही असंख्य फायदे आहेत.

7/8

Perfect Time To Sleep At Night

झोपेच्या आणि जेवणाच्या वेळा पाळल्यात तरी आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात. शरीराचंही एक घड्याळ असतं त्याचं संतुलन कायम ठेवलं पाहिजे.  

8/8

Perfect Time To Sleep At Night

Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.