Health Tips: विचित्र दिसणारी 'ही' फळे अनेक गंभीर आजारांवर आहेत रामबाण, जाणून घ्या फायदे

most unique fruits in the world : निसर्गाने आपल्याला अशी अनेक फले दिली आहेत, जी चवीसोबतच आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या तत्त्वांनीही भरलेली आहेत. अशीच पाच फळे आहेत जी दिसायला विचित्र आहेत पण अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरत आहे.    

Jan 23, 2024, 14:34 PM IST
1/6

लोक ड्रॅगन फ्रूटला चीनचे फळ मानतात पण असे नाहीये. जरी ड्रॅगन फ्रूटचे मूळ मेक्सिकोमध्ये असल्याचे मानले जात असले तरी आज ते जगाच्या विविध भागांमध्ये उत्पादित केले जाते. ड्रॅगन फ्रूट हायलोसेरस नावाच्या कॅक्टसवर वाढते. ड्रॅगन फ्रूट हे पोषक तत्वांनी युक्त अन्नपदार्थ आहे. याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत.

2/6

सालक हे इंडोनेशियातील एक फळ आहे, ज्याला त्याच्या बाहेरील थर किंवा सालीमुळे स्नेक फ्रूट असेही म्हणतात. हे फळ दिसायला कुरकुरीत असले तरी चवीला थोडे गोड आणि आंबट असते. इंडोनेशियामध्ये त्याच्या 15 पेक्षा जास्त जाती आहेत. 

3/6

लिचीसारखे दिसणारे हे फळ दक्षिण आशियामध्ये आढळते.  हे फळ लिचीसारखी दिसते पण तिचा बाहेरचा थर लाल रंगाच्या केसांसारखा असतो. त्याची चव गोड असते आणि ती लिचीसारखी रसदारही असते.

4/6

हे एक अतिशय अनोखे फळ आहे, जे ब्राझीलमध्ये आढळते. हे एक फळ झाडाच्या खोडावर वाढते. ब्लॅकबेरीसारखे दिसणारे हे फळ द्राक्षासारखे चवीचे असते आणि जेली आणि वाईन बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

5/6

हे एक लहान फळ आहे, जे जॅकफ्रुटासारखे दिसते, ज्याला दक्षिण पूर्व आशियामध्ये 'फळांचा राजा' देखील म्हटले जाते. डुरियनचा वास खूप तीव्र आहे. गोड आणि आंबट चव असलेले हे फळ आपल्या आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरते, जसे की हाडे मजबूत करणे, कर्करोगाचा धोका कमी करणे, अॅनिमिया बरा करणे इत्यादी आजारांवर उपयोगी ठरते.  

6/6

अक्की, अतिशय विचित्र नाव असलेले हे फळ जमैकाचे राष्ट्रीय फळ आहे. हे नाशपातीसारखे फळ किंचित लाल आणि पिवळ्या रंगाचे आहे, जे अनेक जमैकन पाककृतींमध्ये देखील वापरले जाते.