फक्त 1 महिना खा हे 7 पदार्थ; रक्तातील कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील, हृदय राहिल निरोगी

कॉलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. आजच्या लाइफस्टाईल आणि खाण्याची सवयी यामुळं आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी महिनाभर असा आहार घेतल्यास तुमचं कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिलं. 

| Jan 19, 2025, 14:20 PM IST

कॉलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. आजच्या लाइफस्टाईल आणि खाण्याची सवयी यामुळं आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी महिनाभर असा आहार घेतल्यास तुमचं कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिलं. 

1/7

फक्त 1 महिना खा हे 7 पदार्थ; रक्तातील कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील, हृदय राहिल निरोगी

health tips in marathi 7 foods that lower cholesterol know your Diet

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढणारे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिलं. अशावेळी डाएटमध्ये त्या पदार्थांचा समावेश करा ज्यात भरपूर फायबरचे प्रमाण असेल. यात फळे, भाज्यांचा आवश्यक समावेस करा. सफरचंद, नासपती, राजमा, स्प्राउट्स, कडधान्यसारख्या वस्तुंचे सेवन करा. फायबर रक्तात साचलेले कोलेस्टॉल बाहेर काढते. 

2/7

कोलेस्ट्रॉल हाय असेल तर तुम्ही वांग जरुर खा. वांग्यात हाय डायटरी फायबर असते. फायबर ब्लड कोलेस्ट्रॉल लेव्हलमध्ये सुधारणा करते. यात हृदय रोग, स्ट्रोक, लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह यासारख्या समस्यांवर मात करतो. 

3/7

भेंड्यात असलेले मुसिलेज बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करुन गुड कोलेस्ट्रॉल वाढवते. या जेलमुळं शौचातून शरीरातून साचलेले बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून खेचून बाहेर काढते. 

4/7

ओट्सचे सेवन करुन तुम्ही कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवू शकतात. यातील पोषक तत्व हृदय निरोगी ठेवते. त्यामुळं तुम्ही नाश्तात ओट्स खावू शकतात. 

5/7

लिंबू पाण्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती बूस्ट होते. तसंच, कोलेस्ट्रॉलदेखील नियंत्रणात राहते. तज्ज्ञांच्या मते लिंबू पाण्यात कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवण्यास चांगले काम करते. सकाळी जर तुम्ही लिंबू पाणी प्यायलात तर रक्त वाहिन्यांमध्ये साचलेले ट्राइग्लिसराइड्स पूर्णपणे बाहेर काढण्यास मदत करते. 

6/7

सुकामेवा देखील हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. बदाम, आक्रोड, पिस्ता, ब्राजील नट्स, काजू खाल्ल्यानेही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. हे सर्व ड्रायफ्रुट्स हृदय निरोगी ठेवते. 

7/7

ग्रीन टी कॅटेचिन नावाच्या अँटीऑक्सिडेंटसह अनेक लाभ मिळतात. ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर सुधारतो.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)