High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायात दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा

 Cholesterol : आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

| Dec 13, 2022, 13:43 PM IST

Bad Cholesterol Warning Sign In Legs:  आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. अन्नामध्ये जास्त मसालेदार पदार्थांचा समावेश केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level)  वाढते. शरीराच्या काही भागात ही लक्षणे दिसू लागतात. चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल शोधण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. याशिवाय लठ्ठपणा आणि हृदयाभोवती दुखणे हेही कोलेस्टेरॉल (High Cholesterol)वाढल्यामुळे होऊ शकते. 

1/5

जर तुमचे पाय अचानक थंड झाले तर हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण मानले जाऊ शकते. हिवाळ्यात पाय थंड पडत असले तरी उन्हाळ्यातही पाय थंड होऊ लागले तर त्याचे कारण उच्च कोलेस्टेरॉल असू शकते. 

2/5

शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. त्यामुळे शरीरातील रक्तस्त्रावाचा वेगही मंदावतो. असे झाल्यावर पाय दुखू लागतात. पाय दुखणे सतत जाणवते. 

3/5

उच्च कोलेस्टेरॉलमुळे पायांच्या नखांचा रंग बदलू शकतो. नखांभोवतीच्या त्वचेचा रंगही बदलतो. याशिवाय बोटांची त्वचा चमकदार दिसू लागते आणि घट्ट होऊ लागते, याशिवाय नखे जाड होतात आणि हळू हळू वाढतात. 

4/5

जर पाय किंवा तळवे यांच्या जखमा दीर्घकाळ बऱ्या होत नसतील तर समजून जा, तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली आहे. खराब रक्ताभिसरणामुळेही ही समस्या उद्भवू शकते. त्याचे नुकसान नंतर पायांना होते. यामुळे पायातील फोड बरे होण्यास बराच वेळ लागतो. 

5/5

चालताना अचानक पाय दुखत असल्यास किंवा मुरडणे हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण मानले जाऊ शकते. हे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे देखील होऊ शकते. यामुळे स्नायूंनाही नुकसान होते.    (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)