10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी

फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खासकरुन पेरु आरोग्यासाठी उत्तम असल्याचे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. पेरु चवीलादेखील छान असतो आणि आरोग्यासाठी पौष्टिकदेखील असतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे पेरु, त्याचे फायदे जाणून घेऊया. 

Mansi kshirsagar | May 14, 2024, 18:16 PM IST

फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खासकरुन पेरु आरोग्यासाठी उत्तम असल्याचे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. पेरु चवीलादेखील छान असतो आणि आरोग्यासाठी पौष्टिकदेखील असतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे पेरु, त्याचे फायदे जाणून घेऊया. 

1/8

10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी

health Benefits of Guava for diabetes patients control sugar

पेरू खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक असे पोषकतत्वे असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील खुप गुणकारी आहे. पेरुमध्ये असलेल्या पौष्टिक गुणांमुळं याला संस्कृतमध्ये 'अमृत'देखील म्हणतात. 

2/8

health Benefits of Guava for diabetes patients control sugar

 ब्लड शुगर वाढल्यानंतर आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळं त्यांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरूचे फळ औषधापेक्षा कमी नाहीये. त्यामुळं रुग्णांनी या फळाचा समावेश त्यांच्या आहारात समावेश करावा. 

3/8

health Benefits of Guava for diabetes patients control sugar

पेरुमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असते त्यामुळं मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच, पेरू व्हिटॅमीन सी, लायकोपीन आणि अँटी ऑक्सीडेंट गुणांची समृद्ध आहे. पेरुमध्ये असलेल्या फायबरमुळं पोट साफ होण्यासही मदत होते. त्यामुळं ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते.

4/8

health Benefits of Guava for diabetes patients control sugar

 पेरुमध्ये आयर्न, फायबर आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण आढळते. हे सर्व गुण टाइप 2 डायबिटीज रुग्णांसाठी लाभदायक ठरु शकतात.   

5/8

health Benefits of Guava for diabetes patients control sugar

पेरुमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळं तुमचे पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते. त्यामुळं चटर-पटर खाण्यावर ब्रेक लागतो. वजन नियंत्रणात असल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवणेही सोप्पं जाते. 

6/8

health Benefits of Guava for diabetes patients control sugar

पेरुमध्ये कॅलरी आढळतात. यात फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळं भुक कमी लागते. हे मेटाबॉलिज्मदेखील बुस्ट करते. पेरु खाल्ल्याने वजनदेखील नियंत्रणात राहते. 

7/8

health Benefits of Guava for diabetes patients control sugar

 पेरू अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करते. त्यामुळं मधुमेहामुळं डॅमेज झालेल्या नर्व रोखतात. तसंच, पेरुमध्ये व्हिटॅमीन सी आढळले जाते.   

8/8

Disclaimer

health Benefits of Guava for diabetes patients control sugar

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)