लसूण खाण्याचे फायदे: अनेक आजारांवर औषध आहे लसूण; जेवणाआधी खा फक्त तीन पाकळ्या

Health Benefits Of Eating Garlic: जेवणात लसणाचा वापर हमखास केला जातो. लसणाची फोडणी आणि त्याची चव एक वेगळीच असते.  लसूण आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर असतो.  जेवणाच्या आधी लसणाच्या तीन पाकळ्यांचे सेवन केल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. लसूण खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात हे जाणून घेऊया.

Mansi kshirsagar | Aug 01, 2024, 15:00 PM IST
1/10

अनेक आजारांवर औषध आहे लसूण; जेवणाआधी खा फक्त तीन पाकळ्या

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

लसूण आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर असतो.  जेवणाच्या आधी लसणाच्या तीन पाकळ्यांचे सेवन केल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. लसूण खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात हे जाणून घेऊया.

2/10

हृदयासाठी खूप फायदेशीर

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

लसूण हे हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळं हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यात अललेले सल्फर कपाउंड ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करते. तसंच, हृदयाचे आरोग्यही सुधारते. 

3/10

कर्करोगाचा धोका

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

लसणाचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. लसूणमध्ये असलेले अँटीऑक्सीडन्ट कॅन्सरच्या सेल्स निर्माण करणाऱ्या फ्री रेडिकलचा धोका कमी करतात. 

4/10

अँटीबायोटिक

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

लसणात असलेले अँटीबायोटिक विविध इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात. त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते. व वारंवार होणारा खोकला आणि सर्दीचे प्रमाणदेखील कमी होते.

5/10

सांधेदुखी

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

ज्यांना सांधेदुखीचा त्रास असेल अशा लोकांनी तर आवर्जुन लसणाचे सेवन करावे. यामुळं वेदना कमी होतात तसंच, सूजही कमी होते. 

6/10

पचनशक्ती

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

लसूण खाल्ल्याने पचनशक्तीदेखील मजबूत होते. पचनसंस्थेचे डिटॉक्स करण्यासही लसूण मदत करते. अन्नाचे पचन करण्यास पुरेशी असलेली पोषकतत्वेही लसूण पुरवते. 

7/10

इन्फेक्शन

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

लसणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात त्यामुळं जेवणाच्या आधी लसणाच्या तीन पाकळ्या खाल्ल्यास शरीरातील इन्फेक्शन आणि आजार दूर पळतात. 

8/10

हाडांचे आरोग्य

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

लसूण खाल्ल्याने हाडांचे आरोग्यदेखील सुधारते. तसंच, हाडांना बळकटी मिळते.

9/10

निरोगी त्वचा

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

निरोगी व तजेल त्वचा मिळवण्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे. स्कीन इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म असतात त्यामुळं त्वचा तजेल होते. 

10/10

Disclaimer

health benefits of consuming 3 cloves of garlic before lunch

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)