नीता अंबानी फिटनेस: वयाच्या 60 व्या वर्षी नीता अंबानी फिटनेसमध्ये देतात सुनेला टक्कर, काय आहे रहस्य?

Nita Ambani Fitness Secret: फिटनेसचा विचार केला तर नीता अंबानी एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाहीत. वयाच्या 60 व्या वर्षी देखील त्या फिटनेसमध्ये सुनांनाही टाकतात मागे. पाहा काय आहे कारण? नीता अंबानी आपल्या फिटनेसपासून ते आहारापर्यंत सर्व गोष्टींची  खूप काळजी घेतात. 

| Aug 01, 2024, 16:10 PM IST
1/6

अधिक काळजी

नीता अंबानी आपल्या फिटनेसपासून ते आहारापर्यंत सर्व गोष्टींची  खूप काळजी घेतात. 

2/6

चेहऱ्यावरील चमक

नीता अंबानींच्या चेहऱ्यावर नेहमीच एक खास चमक असते. वयाच्या 60 व्या वर्षी देखील त्यांच्या चेहऱ्यावर सुनेसारखीच चमक पाहायला मिळते.

3/6

दिनचर्या

व्यायाम, खाण्याच्या सवयी आणि रात्री झोपेपर्यंत सर्व गोष्टी नीता अंबानी या वेळेवर करतात. त्या दिनचर्येबाबत खूप कडक आहेत. 

4/6

संतुलित आहार

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी नीता अंबानी संतुलित आहार घेतात. त्या भरपूर फळे, भाज्या आणि बीटरूट ज्यूस पितात.

5/6

व्यायामाची आवड

नीता अंबानी यांना व्यायामाची खूप आवड आहे. त्या त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून व्यायामासाठी वेळ काढतात. नियमितपणे योगा आणि बॉडीवेट एक्सरसाइज करतात. 

6/6

मॉर्निंग वॉक

चालणे हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. नियमित मॉर्निंग वॉक केल्याने वजन नियंत्रित राहते. मानसिक आरोग्य सुधारते, शरीरात ऊर्जा येते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.