अतिप्रमाणात लसूण खाताय? आत्ताच थांबवा, 'हे' तोटे जाणून घ्या

लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आर्युवेदातदेखील लसणाचे फायदे सांगितले आहेत. मात्र अतिप्रमाणत लसूण खाल्ल्याने आरोग्याला अपाय होऊ शकते

| Jun 19, 2023, 20:04 PM IST

Garlic Side Effects: लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आर्युवेदातदेखील लसणाचे फायदे सांगितले आहेत. मात्र अतिप्रमाणत लसूण खाल्ल्याने आरोग्याला अपाय होऊ शकते

1/5

अतिप्रमाणात लसूण खाताय? आत्ताच थांबवा, 'हे' तोटे जाणून घ्या

harmful effects of garlic that you should know

भारतीय गृहिणी जेवण बनवत असताना हमखास लसणाची फोडणी देतात. पदार्थांमध्ये लसणाचा वापर केल्याने चव छान येते तसंच, लसूण आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. लसणात अनेक औषधी गुणधर्म असतात. काहीजण कच्चा लसूणदेखील खातात. मात्र, अतिप्रमाणात लसूण खाणं योग्य नाही. त्यामुळं तुमची तब्येत बिघडू शकते. 

2/5

तोंडाला वास येणे

 harmful effects of garlic that you should know

लसूण गरम असतो त्यामुळं थंडीत अनेकदा लोक लसणाच्या कच्च्या पाकळ्या खातात. मात्र, अतिप्रमाणात खाल्ल्याने तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

3/5

रक्तदाब

harmful effects of garlic that you should know

ज्यांचे रक्तदाब कमी असतो त्यांनी लसूण प्रमाणातच खावा. जास्त लसूण खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. 

4/5

छातीत जळजळ

harmful effects of garlic that you should know

जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने हृदयासंबंधित समस्या जाणवू शकतात. लसणात असलेल्या अॅसिडिक गुणधर्मामुळं छातीत जळजळ होऊ शकते. अनेकदा हे सहन करण्यापलीकडे जाते. त्यामुळं लसूण प्रमाणातच खावा

5/5

कच्चा लसूण खाण्याचे तोटे

harmful effects of garlic that you should know

कच्चा लसूण खाल्ल्यास पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, छातीत जळजळ अशाप्रकारच्या समस्या होऊ शकतात