राजकोटच्या Game Zone मध्ये अग्नीतांडव, 24 जणांचा मृत्यू... आकडा वाढण्याची भीती

Fire in Game Zone: गुजरातमधल्या राजकोट इथं एका गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 24 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेपासून एक किलोमीटर दूर आगीचे लोळ दिसत होते.

राजीव कासले | May 25, 2024, 20:46 PM IST
1/5

गुजरातच्या राजकोटमध्ये शनिवारी गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेम झोनमध्ये आग लागल्यानंतर एकच धावपळ उडाली. घटनेपासून एक किलोमीटर दूर आगीचे लोळ दिसत होते.

2/5

राजकोटमध्ये लागलेल्या भीषण आगीचा व्हिडिओही समोर आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा-कॉलेजला सुट्टी असल्याने गेम झोनमध्ये मोठ्या संख्येने मुलं उपस्थित होती. यात अनेक लहान मुलांचाही समावेश होता.

3/5

आग इतकी भीषण होती की संपूर्ण गेम झोन जळून खाक झालं. धक्कादायक म्हणजे पत्राच्या एका शेडखाली हा गेम झोन सुरु होता. हा गेम झोन अधिकृत होता की नाही याची माहिती घेतली जात आहे. 

4/5

आगीचं स्वरुप पाहता अग्नीशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. पण वाऱ्याच्या वेगामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

5/5

शनिवारची सुट्टी असल्याने गेम झोनमध्ये गर्दी होती. गेम झोनला आग नेमकी कशी कशामुळे लागली याचं कारण अदयाप समोर आलेलं नाही. आगीला कारणीभूत असलेल्या दोषींवर कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.