Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यानिमित्त खास 'हे' मराठमोळे दागिने परिधान करा

सणावाराला छान दिसण्यासाठी दागिने सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे स्त्रिया दागिन्यांना कायमच पसंती देतात. या गुढीपाडव्यासाठी खास मराठी पारंपारिक दागिन्यांची माहिती जाणून घेऊयात. 

Apr 03, 2024, 19:38 PM IST

चैत्र महिन्यातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. वसंत ऋतूचं होणार आगमन आणि गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रीय मोठ्या थाटामाटात साजरा करतात. गुढीपाडवा  हा मराठी नववर्षातील पहिला सण असून साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी एखादी वस्तू, किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. 

1/7

चिंचपेटी

या मराठमोळ्या दागिन्याचा शोध सोळाव्या शतकात लागल्याचं म्हटलं जातं. चिंचेच्या आकाराच्या दिसणाऱ्या या पेट्यांची गुंफण हिऱ्यात किंवा मोत्यांमध्ये केला जातो. चिंचपेटी हा दागिना ठुशी प्रकारातील असला तरी पुर्णपणे वेगळा आहे.   

2/7

जास्त दागिने घालण्यापेक्षा चिंचपेटी हा एकच दागिना गळ्यात शोभून दिसतो. तीन किंवा पाच पेट्यांचा हा दागिना सहसा फार परीचयात येत नाही. पेशवाई काळात या दागिन्याला फार महत्त्व होते. खणाची साडी किंवा नऊवारी साडीवर चिंचपेटी शोभून दिसते.   

3/7

कोल्हापुरी साज

हा अत्यंत लोकप्रिय असा दागिन्याचा प्रकार आहे. लाखेवर तयार केलेला हा या दागिन्यात कमळ, मासा, नाग अशा विविध आकाराचे नक्षीकाम यावर केले जाते. पुर्वीच्या काळी ठुशी प्रमाणे कोल्हापुरी साज हा विवाहीत स्त्रियांच्या आवडीचा दागिना म्हटलं जात असतं. या गुढीपाडव्याला  मराठमोळ्या लुकसाठी कोल्हापुरी साज हा उत्तम पर्याय आहे.  

4/7

नागोत्र

हाताच्या दंडावर हा दागिना घातला जातो. बाजूबंद या प्रकारातील हा दागिना असून तो नागाच्या वेटोळ्याच्या आकाराप्रमाणे दिसणारा दागिना म्हणजे नागोत्र. याचाच दुसरा प्रकार म्हणजे नागबंद. फणा काढलेल्या नागाच्या आकाराचा दागिना म्हणून त्याला नागबंद असेही म्हणतात. खास नऊवारी साड्यांवर हा दागिना बायका आपल्या दंडावर मिरवीत असे. वाकी, वेळा आणि तोळेबंद हे बाजूबंदाचे वेगळे प्रकार आहेत.   

5/7

गोठ

बांगड्यांचे अनेक प्रकार आहेत. पाटल्या, तोडे यांप्रमाणे गोठ हा देखील बांगड्यांचा प्रकार आहे. सणावाराला किंवा लग्नकार्यात पुर्वीच्या  स्त्रिया हातात गोठ घालत असे. सोन्याच्या धातूचं जाडसर कडं अशी साधारण गोठ या दागिन्याची रचना असते. हिरव्या बांगड्यामध्ये सोनेरी जाडसर असा हा गोठ पारंपारिक लुकला जास्त शोभून दिसतो. 

6/7

मेखला

कंबर पट्टा, साखळी हे खास स्त्रियांमध्ये लोकप्रिय असे दागिने आहेत. साडीवर सोन्याचा किंवा चांदीचा कंबर पट्टा, साखळी किंवा छल्ला सौंदर्यात आणखीनच भर घालते. नाजूकशी साखळी असून बाजूने तिच्यावर नक्षीदार काम केलेलं असतं. मेखला हा सोन्याचा दागिना असून मराठमोळ्या दागिन्याचा एक प्रकार आहे. 

7/7

तन्मणी

साधारण मंगळसूत्रासारखा साधारण दिसणारा हा मोत्यांचा दागिना आहे. मोत्यांच्या माळेतील तन्मणीचं पेंडन्ट हे वेगवेगळ्या रंगीबेरंगी खड्यांमध्ये असतं. छोट्या आणि मोठ्या दोन्ही प्रकारांत तन्मणी उपलब्ध आहे. काट पदराच्या साड्यांवर पारंपारिक पद्धतीचा हा तन्मणी अगदी शोभून दिसतो.