एक SMS पाठवून गुगलने कर्मचाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता

जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. मात्र, अनेकांना यामध्ये नोकरीची संधी मिळत नाही. तर काहींना नोकरीची संधी मिळते. मात्र, तितक्यात वेगातही कंपनीतून लोकांना बाहेरचा रस्ता देखील दाखवला जातो.

Diksha Patil | Feb 22, 2024, 18:30 PM IST
1/7

गुगलमध्ये नोकरी करणाऱ्यांवर आता कपातीचे संकट ओढावलं आहे. या मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या अनेकांना अचानक नोकरी गमवावी लागली आहे. 

2/7

गुगल कंपनीचे नवीन प्रोजेक्ट जेमिनी एआय चॅटबॉट आहे. याच प्रोजेक्टवर कंपनीने काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला फक्त एसएमएस पाठवून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.

3/7

गुगलचे माजी कर्मचारी ॲलेक्स कोहेन यांनी कंपनीतून काढून टाकल्याचा त्यांचा अनुभव शेअर केला आहे. हँगआऊट आणि गुगल ड्राइव्हवरील त्यांचा अॅक्सेस अचानक काढून घेण्यात आला.

4/7

यानंतर मॅनेजरने अचानक त्यांना एक एसएमएस पाठवून तुम्हाला नोकरीवरुन काढल्यात आलं आहे असे सांगण्यात आलं.

5/7

ॲलेक्स कोहेन यांनी सांगितले की, 'ते जेमिनी एआय चॅटबॉट मॉडलशी संबधित अल्गोरिदमवर काम करत होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी टर्मिनेशनबद्दल माहिती दिली.'

6/7

'मला सांगायला हे दुःख होत आहे की, मला गुगलमधून काढून टाकण्यात येत आहे. जेमिनी सुधारण्यासाठी विकसित केलेल्या अल्गोरिदमची जबाबदारी माझ्याकडे होती.'

7/7

'मी 12 महिन्यांचा प्रोबेशन पीरिएडमध्ये आहे आणि त्यानंतर मी पुढे काय करायचे ते ठरवेन. LLM आणि AI शिकण्याचा हा 5 महिन्यांचा मजेशीर प्रवास होता.'