24 हजारांनी स्वस्त झाली 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किमीची ड्रायव्हिंग रेंज; फक्त 400 रुपयांत आणा घरी

कंपनीने Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटर रेंजच्या किंमतीत 21 टक्के घट करत असल्याची घोषणा केली आहे. पण ही ऑफर ठराविक काळासाठी आहे.   

Feb 22, 2024, 16:55 PM IST
1/9

एकीकडे बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या मागणीत वाढ होत असताना दुसरीकडे त्यांच्या किंमतीत घट होताना दिसत आहे. ओला, अथर यांच्यानंतर आता आणखी एका कंपनीने दुचाकीच्या किंमतीत घट केली आहे.   

2/9

इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती करणारी कंपनी Bounce Infinity ने आपल्या एकमेव इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 24 हजारांनी कमी केली आहे.   

3/9

कंपनीने Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटर रेंजच्या किंमतीत 21 टक्के घट करत असल्याची घोषणा केली आहे. पण ही ऑफर ठराविक काळासाठी आहे.   

4/9

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 89 हजार 999 रुपयांपासून सुरु होत आहे. आधी ही किंमत 1 लाख 13 हजार होती.   

5/9

ग्राहक 31 मार्च 2024 पर्यंत ही इलेक्ट्रिक स्कूटर या नव्या किंमतीत खरेदी करु शकतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन फक्त 499 रुपयात ही दुचाकी बूक करु शकता.   

6/9

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 2.5kW क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. जो सिंगल चार्जमध्ये 100 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.   

7/9

ही इलेक्ट्रिक स्कूटर घरातील सॉकेटवर चार्ज केल्यास फक्त 40 मिनिटात 0 ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.   

8/9

यामध्ये 12 लीटरचा अंडरसीट स्टोरेज. युएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी लायटिंग, टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेंशन, रिजेनरेटिंग ब्रेकिंग सिस्टमसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.   

9/9

या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 65 किमी आहे. ही स्कूटर फक्त 8 सेकंदात ताशी 0 ते 40 किमी वेग पकडण्यात सक्षम आहे.