Weekend ला झोपा काढणाऱ्यांसाठी Good News! संशोधक म्हणतात, 'जे आठवड्याभराची झोप भरुन काढतात त्यांना...'

Good News For Those Who Sleep On Weekends: संसोधकांनी नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालामध्ये शनिवार, रविवार झोपा काढणाऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. या संशोधनामध्ये 90 हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आल्याने समोर आलेली आकडेवारी आणि हा अभ्यास विश्वासार्ह मानला जात आहे. नेमकी काय आहे ही गुड न्यूज आणि संशोधकांनी काय म्हटलंय पाहूयात...

Swapnil Ghangale | Sep 02, 2024, 12:51 PM IST
1/11

sleepweekends

तुम्हाला सुद्धा विकेण्डला झोपायची सवय असेल तर हे वाचाच आणि तुम्हाला अशा झोपेवरुन सातत्याने बोलणाऱ्यांनाही ही लिंक नक्की पाठवा. संशोधकांनी नेमकं अहवालात काय म्हटलं आहे ते वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल यात शंका नाही. अहवालात आहे तरी काय पाहूयात...

2/11

sleepweekends

आठवडाभर ऑफिसचं काम, शाळा आणि इतर कामांमुळे झोप पूर्ण होत नाही असे आपल्यापैकी अनेकजण असतील. तुम्हालाही कमी झोप असल्याने उद्भवणाऱ्या समस्या यापूर्वी जाणवल्या असतील. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये आठवडाभर झोप पूर्ण न झाल्याने विकेण्डला झोपा काढणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. एका संशोधनामधून अशा व्यक्तींना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

3/11

sleepweekends

ईएससी काँग्रेस 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालामध्ये आठवड्याभर झोप न मिळाल्याने विकेण्डला बराचसा काळ झोप काढणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो असा दावा करण्यात आला आहे. अशा लोकांना हदयविकाराचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.   

4/11

sleepweekends

"भरपाई स्वरुपात झोप घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो," असं या संशोधनामध्ये म्हटलं आहे. या संशोधनाचे सहलेखक यानजुंग साँग असून ते चीनमधील बिजिंग येथील फुवाई हॉस्पीटलमधील नॅशनल सेंटर फॉर कार्डीओव्हॅसक्युलर डिसिजेस येथील स्टेट कि लेबॉरेट्री ऑफ इन्फेशिअस डिसीजेस विभागात कार्यरत आहेत.   

5/11

sleepweekends

"आठवडाभर कमी झोप होत असलेल्या लोकांपैकी जे लोक विकेण्डला जास्त झोपतात त्यांना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असल्याचं अधिक प्राकर्षाने जाणवलं, " असं यानजुंग साँग म्हणाले. 

6/11

sleepweekends

या संशोधनामध्ये संशोधकांनी एकूण 90 हजार 903 जणांचा अभ्यास केला. युनायटेज किंडमधील बायोबँक प्रोजेक्ट अंतर्गत या लोकांची माहिती गोळा करुन आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये त्यांची झोप घेण्याची सवय आणि हृदयविकाराची शक्यता या दोन गोष्टी पडताळून पाहण्यात आला. यासाठी या लोकांचा डीप स्लीप डेटा म्हणजेच गाढ झोपेत असल्याची वेळही मोजण्यात आली.   

7/11

sleepweekends

या संशोधनामध्ये रोज रात्री सात तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांना झोपेची कमतरता आहे असं गृहित धरण्यात आले. 90 हजार 903 जणांपैकी 21.8 टक्के म्हणजेच 19 हजार 816 लोकांना कमी झोप मिळते हे निष्पण्ण झालं. इतर लोकांना कधीतरी पुरेशी झोप मिळत नाही असं दिसून आलं. मात्र या लोकांची झोप किमान सात तास तरी होत होती. मात्र ही गोष्ट लिमिटेश ऑफ डेटा म्हणून आकडेमोडीमध्ये सामावून घेण्यात आली.

8/11

sleepweekends

रुग्णालयांमधील माहिती, तसेच मृत्यूच्या कारणांसंदर्भातील माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये हृदयासंदर्भातील कोणत्या समस्या आहे याची माहिती घेण्यात आली. यामध्ये हृदयासंदर्भातील आजार, हृदय बंद पडणे, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, हदय विकाराचा झटका अशा वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गिकरण करण्यात आलं.  

9/11

sleepweekends

सहभागी झालेल्या व्यक्तींचे मागील 14 वर्षांपासूनचे अहवाल आणि आरोग्य विषयक माहितीचाही अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये जे लोक आठवड्याच्या शेवटी झोप पूर्ण करुन घेतात त्यांना हदयासंदर्भातील समस्या होण्याची शक्यता कमी असते असं दिसून आलं. 

10/11

sleepweekends

दिवसभरातून सात तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे विकेण्डला झोप पूर्ण न करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका हा पूर्ण झोप घेणाऱ्यांपेक्षा अधिक असतो. महिला आणि पुरुष दोघांनाही हे लागू होतं, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

11/11

sleepweekends

"आज आपल्यापैकी अनेकजण कमी झोप घेतात. जे झोप पूर्ण करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी अधिक झोपतात त्यांना हदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता तुलनेनं कमी असते, असं आमच्या संशोधनात आकडेवारीच्या आधारे स्पष्ट झालं आहे," असं यानजुंग साँग म्हणाले.