सुंदर दिसण्याची गोल्डन थेरपी... एकदा नक्की ट्राय

त्वचा उजण्यासाठी किंवा त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण अनेकदा वेगवेगळे घरगुती आणि कॉस्मेटीक उपाय करतो. पण तुम्हाला माहितेय का सोन्याच्या वापराने त्वचा उजळण्यास मदत होते. सोन्याच्या वापराने त्वचेला होणारे फायदे जाणून घेऊयात... 

Mar 09, 2024, 19:21 PM IST
1/7

त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी  डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आहार घेतो पण असं म्हटलं जातं की , सोन्यामुळे तुमची त्वचा उजळते आणि चांदीच्या वापराने तुमची बुद्धी तल्लख  होते. 

2/7

तज्ञांच्या अभ्यासानुसार असं स्पष्ट झालं की, सोनं वापल्याने त्वचेवर चकाकी येते. त्याशिवाय  त्वचा कोरडी पडत असेल किंवा अंगावर सूज येत असेल तर सोन्याच्या वापराने या समस्या दूर होतात. 

3/7

याशिवाय सूर्याची अतिनील किरणं आणि हवेतील प्रदूषण यापासून सुद्धा त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सोनं फायदेशीर ठरतं. 

4/7

इतर धातूंच्या तुलनेत  सोन्याच्या दागिन्यांना कायमच पसंती दर्शवली जाते. या धातूत अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म आढळतात. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांनी जसं सौंदर्य खुलून दिसतं तसचं यात असलेल्या ऑक्सिडेंटमुळे त्वचेचा पोत नैसर्गिकरीत्या सुधारण्यास मदत होते. 

5/7

सोन्यात आयर्नचं प्रमाण आढळून येतं. त्यामुळे ,शरीरीतील पेशी उत्तेजीत होतात आणि  त्वचेचे विकार होत नाही.   

6/7

बाजारात मिळणाऱ्या अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये 24 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.  

7/7

उन्हामुळे जर त्वचा टॅन  झाली असेल तर गोल्ड फेस पॅक चेहऱ्यावर चकाकी येण्यास फायदेशीर ठरतो.  (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)