सोने-चांदी झाले स्वस्त! जाणून घ्या एका क्लिकवर आज किती स्वस्त झाले सोने?

Gold Silver Price Today : अलीकडच्या काळात देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान सोने-चांदीची विक्रीने मुसंडी मारली. अशातच सोने आणि चांदीच्या खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण सोने आणि चांदी हे  दोन्ही मौल्यवान धातू स्वस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत खरेदीदारांना पुन्हा एकदा सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी आहे. त्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे नवे दर जाणून घ्या... 

May 23, 2023, 12:39 PM IST
1/7

Gold Silver Price Today

सध्या राज्यात लग्नसराईची धामधूम सुरु आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची जोरदार मागणी असते. तसेच सोन्या-चांदीच्या दराच्या दरवाढीलाही ब्रेक लागला आहे. 

2/7

Gold Silver Price Today

जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीत घसरण पाहायला मिळत असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने जून फ्युचर्स 333 रुपयांनी घसरून 59,915 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाणार आहे. तर एमसीएक्स चांदी 383 रुपयांनी घसरून 72,366 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहेत.

3/7

Gold Silver Price Today

गेल्या ट्रेडिंग सत्रात, MCX गोल्ड जून फ्युचर्स 60,241 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. एमसीएक्स चांदीचा जुलै फ्युचर्स 72,366 रुपये प्रति किलोवर बंद झाला. 

4/7

Gold Silver Price Today

तर गुडरिटर्न्स वेबसाइटवर जाहीर झालेल्या किमतीनुसार मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर अशा अनेक भागात  22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 56,290 रुपये असणार आहेत.

5/7

Gold Silver Price Today

तर दुसरीकडे मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, वडोदरा, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, पाटणा, नागपूर, चंदीगड, नाशिक, सुरत, गुडगाव, गाझियाबाद, नोएडा, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर येथे चांदीचा दर 75,000 रुपये प्रति किलो आहे. 

6/7

Gold Silver Price Today

तुम्ही घरी बसून सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 किंवा नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता.   

7/7

Gold Silver Price Today

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर, खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासा. तुम्ही BIS CARE APP द्वारे कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.