Gold Silver Price : सोन्या, चांदीचे दर लवकरच होणार कमी

Jan 26, 2021, 12:50 PM IST
1/6

Religare Broking यांची प्रतिक्रिया

Religare Broking यांची प्रतिक्रिया

सोन्याच्या किंमतीवरून रेलिगेयर ब्रोकिंगच्या सुगंधा सचदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 48,500 रुपयाच्या जवळपास असेल. गोल्डचा Sentiment अजून मजबूत नाही मात्र अशी आशा व्यक्त केली आहे की, सोन्याचा दर 50,000 रुपयांपर्यंत पोहोचेल.     

2/6

Kotak Securities ची प्रतिक्रिया

Kotak Securities ची प्रतिक्रिया

कोटक सिक्युरिटीजचे रवींद्र राव यांनी सोन्याच्या दरावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ग्राहकांना सतर्क राहायला सांगितलं आहे. सोन्याचा दर 48,500-48,600 पर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे. सोन्याचा दर 48,600 एवढं होईपर्यंत सोनं खरेदी करू शकतात. 48,600 या दरापर्यंत सोन्याला सपोर्ट करू शकता. यानंतर 49,700 दरापर्यंत पोहोचल्यावर सोन्याची किंमत वाढेल. रवींद्र रावने आशा व्यक्त केली आहे की, पुन्हा एकदा सोन्याचा दर 51,000 रुपये इतका होईल. 

3/6

सोन्याचया दरावर Motilal Oswal यांची प्रतिक्रिया

सोन्याचया दरावर Motilal Oswal यांची प्रतिक्रिया

मोतीलाल ओसवालच्या अमित सजेजा यांनी म्हटलं की, सोन्याच्या दरात करेक्शन होऊ शकतात. यानंतर सोन्याच्या दरात वाढ पाहू शकतो. सोन्याचा दर ४९ हजार झाल्यावर तुम्ही सोनं खरेदी करा. ४९,३५० रुपये सोन्यासाठी पहिलं हर्डल असेल मात्र शॉर्ट टर्म साठी हे टारगेट असू शकतं. 

4/6

Motilal Oswal यांची चांदीच्या दरावर प्रतिक्रिया

Motilal Oswal यांची चांदीच्या दरावर प्रतिक्रिया

मोतीलाल ओसवालच्या अमित सजेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदीला सोन्यापेक्षा चांगला दर आहे. त्यांनी म्हटलं की, MCX वर चांदी ६६,५०० रुपये प्रति किलो असून स्टॉप लॉस ६५,८०० रुपये लावून लक्ष्य हे ६७,०५० रुपये असेल. 

5/6

Religare Broking यांची चांदीच्या दरावर प्रतिक्रिया

Religare Broking यांची चांदीच्या दरावर प्रतिक्रिया

रेलिगेयर ब्रोकिंगच्या सुगंधा सचदेवने म्हटलं की, चांदी आता खरेदी करू शकता. ६६५०० रुपये चांदीकरता एक शॉर्ट टर्म बेस बनवत आहे. ६७,८०० रुपये या करता आहे. आगामी काळात चांदीचा दर हा ६९,५०० रुपये होणार आहे. 

6/6

Kotak Securities कडून चांदीच्या दराबाबत माहिती

Kotak Securities कडून चांदीच्या दराबाबत माहिती

कोटक सिक्युरिटीजचे रवींद्र रावने सिल्वर म्हणजे चांदीबाबत म्हटलं की, याच्या दरात काही कमी होणार नाही. पुढे त्यांनी म्हटलं आहे की,'येणाऱ्या दिवसांत चांदी MCX वर ६९,०००-७०,००० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. जर चांदी ६६,००० रुपये प्रति किलो खाली आली तर खरेदी केली जाऊ शकते. स्टॉपलॉस ६४,००० रुपये ठेवा. तसेच चांदीच्या दरात लक्ष हे ७०,००० असावे.'