7th Pay Commission: होळीच्या आधी वाढू शकतो DA, प्रवास भत्ताही 8 टक्के जादा?
7th Pay Commission : 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 61 लाख पेन्शनधारकांचा चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : 7th Pay Commission : 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 61 लाख पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि जुलै ते डिसेंबर २०२० मधील 4 टक्के महागाई भत्ता वाढ पुन्हा लागू होण्याची प्रतीक्षा आहे. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकार होळी होण्यापूर्वी जानेवारी-जून 2021 मध्ये 4 टक्के डीए वाढ देऊ शकते. सूत्रांनी असेही म्हटले आहे की कोरोनाच्या संकटामुळे जुलै 2020 मध्ये थांबविण्यात आलेला महागाई भत्ताही सरकार जारी करु शकते. मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा जाहीर केलेली नाही.