Magawa Mouse: धाडसी उंदीर ज्याने वाचवला हजारो लोकांचा जीव, मिळवलं सुवर्णपदक

Gold Medalist Mouse: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र या वर्षातील काही गोष्टी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. या वर्षात एका धाडसी उंदराला गमवल्याचं दु:ख आहे. या उंदराने हजारो लोकांचा जीव वाचवला होता. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सुवर्णपदकही देण्यात आलं होतं. या धाडसी उंदराचं नाव मगावा असं होतं. हा मगावा उंदीर कंबोडियाच्या वन प्रतिबंधक विभागात कार्यरत होता. मगावा भूसुरुंग कुठे आहे याचा वास घेऊन शोध घेत असे.

Dec 12, 2022, 13:59 PM IST
1/5

Magawa Mouse

मगावा उंदराला लँडमाइन शोधण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते.  गनपावडरचा वास घेऊन त्याच्या हँडलरला म्हणजेच त्याच्या केअरटेकरला सावध करत असे. मिळालेल्या माहितीनुसार, शूर उंदीर मागावाने त्याच्या कारकिर्दीत 71 भूसुरुंग शोधून काढले. तसेच त्याच्या हँडलरला 38 जिवंत बॉम्बची माहिती दिली. मगावा यांची कारकीर्द 5 वर्षांची असून त्यांनी या काळात अनेकांचे प्राण वाचवले.

2/5

Magawa Mouse

बॉम्ब शोधण्याच्या टीमचा सदस्य असलेल्या उंदीर मगावाला त्याच्या शौर्याबद्दल ब्रिटीश चॅरिटेबल ट्रस्टकडून सुवर्णपदक प्रदान केले होते. ब्रिटीश धर्मादाय संस्थेचा हा पुरस्कार यापूर्वी केवळ कुत्र्यांसाठी राखीव होता. आता उंदीर मगावाला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. कंबोडियात आला तेव्हा मगावा 2 वर्षांचा होता.

3/5

Magawa Mouse

बेल्जियन एनजीओ APOPO कडून उंदीर मगावाला प्रशिक्षण देण्यात आले. त्याच्या 5 वर्षांच्या बॉम्ब-स्निफिंग कारकीर्दीत उंदीर मगावाने 1.4 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन तपासली.

4/5

Magawa Mouse

जानेवारी 2022 मध्ये मगावा उंदराने वयाच्या 8 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. कंबोडियातील लोकांनी शूरवीर मगावा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

5/5

Magawa Mouse

मगावा यांच्या मृत्यूनंतर APOPO संघटनेने सांगितले की, त्यांनी एक धैर्यवान मित्र गमावला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांचे प्राण वाचवण्यात घालवले.