जेनेरिक औषधे इतकी स्वस्त का असतात? कुठे मिळतात? सर्वकाही जाणून घ्या

 डॉक्टरांनी महागडी ब्राण्डेड औषधे लिहून दिल्यास रुग्णांचे जास्त पैसे खर्च होतात. यातून रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने जनेरिक औषधे वापरण्याचे आवाहन केले आहे.

| May 04, 2024, 19:14 PM IST

Generic Medicine Benifits: डॉक्टरांनी महागडी ब्राण्डेड औषधे लिहून दिल्यास रुग्णांचे जास्त पैसे खर्च होतात. यातून रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने जनेरिक औषधे वापरण्याचे आवाहन केले आहे.

1/10

जेनेरिक औषधे इतकी स्वस्त का असतात? कुठे मिळतात? सर्वकाही जाणून घ्या

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

Generic Medicine Benifits: आजारी पडल्यावर आपल्या आरोग्यवर झालेला परिणाम दिसतो. यासोबतच आपल्या खिशालाही चाप बसलेला असतो. कारण औषधे खूप महाग असतात. डॉक्टरांनी महागडी ब्राण्डेड औषधे लिहून दिल्यास रुग्णांचे जास्त पैसे खर्च होतात. यातून रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने जनेरिक औषधे वापरण्याचे आवाहन केले आहे.

2/10

संपूर्ण घराचे बजेट बिघडते

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

कोरोना महामारीनंतर आता कोणतेही व्हायरल इन्फेक्शन सारखा आजार असेल तरी आपण खूप घाबरतो. अशावेळी प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती दररोज औषधे घेते. अशावेळी घरातील अनेकजण आजारी असतील तर संपूर्ण घराचे बजेट बिघडते. कारण पगाराचा मोठा भाग औषधांवर खर्च होतो. 

3/10

ब्रँडेड आणि जेनेरिक

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

जेनेरिक औषधांबाबत लोक आता हळुहळू जागरूक होऊ लागले आहेत. दरम्यान ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांमध्ये काय फरक असतो? जेनेरिक औषधे स्वस्त का असतात? ती कोणत्या मेडिकलमध्ये मिळतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. 

4/10

जेनेरिक औषधे म्हणजे काय?

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

औषध उत्पादक कंपन्या रोगांवर उपचार करण्यासाठी केलेल्या संशोधनाच्या आधारे क्षार बनवतात. त्याचे रूपांतर गोळ्या, कॅप्सूल किंवा इतर औषधांमध्ये होते. वेगवेगळ्या कंपन्या एकच क्षार वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या किमतीला विकतात. क्षाराचे जेनेरिक नाव विशेष समितीने रचना आणि रोग लक्षात घेऊन ठरवले आहे. 

5/10

औषधाच्या किमतीत पाच ते दहापट फरक

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

कोणत्याही क्षाराचे जेनेरिक नाव जगभर सारखेच असते. असे असताना जेनेरिक औषध घेऊन तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेले प्रिस्क्रिप्शन अगदी कमी किमतीत मिळवू शकता. महागडे ब्रँडेड औषध आणि त्याच क्षाराच्या जेनेरिक औषधाच्या किमतीत पाच ते दहापट फरक असू शकतो. कधीकधी किमतीतील फरक 90 टक्क्यांपर्यंत असू शकतो.

6/10

परिणामात नसतो फरक

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

दोन औषधांच्या परिणामात फरक नसतो. फरक फक्त नाव आणि ब्रँडमध्ये असतो. औषधे क्षार आणि रेणूंपासून बनवली जातात. त्यामुळे औषध खरेदी करताना ब्रँड किंवा कंपनीकडे लक्ष न देता क्षाराकडे लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात.

7/10

जेनेरिक औषधांची गुणवत्ता

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

जेनेरिक औषधाचे फॉर्म्युला पेटंट केलेला असतो. पण  त्यात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे पेटंट होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवलेल्या जेनेरिक औषधांचा दर्जा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. त्यांचा प्रभाव ब्रँडेड औषधांसारखाच असतो. 

8/10

जेनेरिक औषधे इतकी स्वस्त का?

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

पेटंट ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. हे करताना त्यांना रिसर्च, विकास, मार्केटिंग, जाहिरात आणि ब्रँडिंग यासाठी प्रचंड खर्च येतो. जेनेरिक औषधे बनवण्यासाठी त्यांच्या पेटंटची मुदत संपण्याची वाट पहावी लागते. त्यानंतर त्यांचे फॉर्म्युला आणि क्षार वापरून जेनेरिक औषधे बनवली जातात. ज्यांच्या चाचण्या आधीच झाल्याआहेत, त्यापासून जेनेरिक औषधे थेट तयार केली जातात. यासोबतच जेनेरिक औषधांच्या किमती सरकारच्या मध्यस्थीने ठरवल्या जातात. या औषधांच्या जाहिरातीवर कुठेही खर्च केला जात नाही.

9/10

तुम्ही जेनेरिक औषधे कुठे खरेदी करू शकता?

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

तुम्ही तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमधून जेनेरिक औषधांची मागणी करू शकता. हेल्थकार्ट प्लस आणि फार्मा जन समाधान वेबसाइट्सवर तुम्हाला जेनेरिक औषधे खरेदी करता येतील. यासोबतच जेनेरिक औषधांची अधिकृत वेबसाइट genericwala.com या दुसऱ्या वेबसाइटवरही तुम्हाला औषधे घेता येतील. 

10/10

आरोग्यावरील खर्च होईल कमी

Generic Medicine Benifits Price Medicals All Details Health Marathi News

डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून दिली तर विकसित देशांमध्ये आरोग्यावरील खर्च 70 टक्के आणि विकसनशील देशांमध्ये 90 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.