PHOTO: देशातील सर्वात आळशी ट्रेन! 46 किमी प्रवासासाठी लागतो इतका वेळ

Slowest Railway in India: देशातील सर्वात आळशी ट्रेन 46 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी लावते 5 तास. मात्र, इतक्या आळशी ट्रेनमध्ये जाण्यासाठी लोक तिकिटांसाठी मोठी गर्दी करत आहेत. प्रवाशी या ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेतात. 

Jul 10, 2024, 11:58 AM IST
1/6

'या' ट्रेन नाव आणि खर्च किती?

ही आहे निलगिरी माउंटन ट्रेन, ज्यातून प्रवास करण्यासाठी प्रथम श्रेणीचं तिकीट विकत घेणार असाल तर तुम्हाला 545 रुपय मोजावे लागणार आहेत. तर द्वितीय श्रेणीसाठी तुम्हाला 270 रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागेल.

2/6

काय आहे ट्रेनची खासियत?

पर्वतांमध्ये रेल्वे लाईन अन् निळ्या आणि क्रीम रंगाच्या लाकडी डब्यांनी बनलेल्या आणि मोठ्या खिडक्या असलेल्या या ट्रेनला 46 किमीचा प्रवास करण्यासाठी 16 बोगदे आणि 250 पेक्षा जास्त पूल पार करावे लागतात.

3/6

निलगिरी एक्स्प्रेस कधी सुरु झाली?

निलगिरी माउंटन रेल्वे ही ब्रिटिशांनी सुरु केलीय. 1899 मध्ये निलगिरीचा प्रवास झाला असून वाफेच्या इंजिनाचा आवाज आणि ट्रेनची शिट्टी तुम्हाला लहानपणाची आठवण घेऊन जातं. 

4/6

46 किमीला 5 तास का लागतात?

निलगिरी माउंटन एक्स्प्रेस ही तामिळनाडूमधील मेट्टुपालयम स्टेशन ते उटीमधून उधगमंडळ स्थानकापर्यंत धावते. ट्रेन सुरुवातीला 5 किमी सरळ धावते. त्यानंतर पुढच्या 12 किमीमध्ये ट्रेन वेगाने 4,363 फूट उंचीवर जाते. त्यामुळे कमी अंतरासाठीही तिला जास्त जास्त वेळ लागतो. 

5/6

ट्रेनच्या तिकीटासाठी लागतात रांगा

देशातील सर्वात हळू धावणाऱ्या या ट्रेनमध्ये अनेक जण प्रवास करण्यासाठी गर्दी करत असतात. सुंदर रस्ते, डोंगर आणि जंगलातून धावणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवाशांना खऱ्या निसर्गाच्या सौंदर्यांचा आनंद लुटता येतो. 

6/6

सर्वात आळशी ट्रेन

तर या निलगिरी माउंटन एक्स्प्रेस ट्रेनला आळशी ट्रेन म्हणून ओळख निर्माण झाली आहे. युनेस्कोने या ट्रेनचा 2005 मध्ये जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.