GK: 'या' शहरात कधीच 12 वाजत नाहीत? तुम्हाला माहितीये का उत्तर? 99 टक्के लोक चुकतात

जगभरातील सर्व शहरांमध्ये, कोणत्या ना कोणत्या चौकात, बेल टॉवर किंवा चर्चवर मोठे घड्याळ बसवलेलं असतं. दरम्यान असं एक शहर आहे ज्या शहराच्या घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. त्या शहराचे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल.   

| Nov 28, 2024, 16:46 PM IST

जगभरातील सर्व शहरांमध्ये, कोणत्या ना कोणत्या चौकात, बेल टॉवर किंवा चर्चवर मोठे घड्याळ बसवलेलं असतं. दरम्यान असं एक शहर आहे ज्या शहराच्या घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. त्या शहराचे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल. 

 

1/7

आपल्या दैनंदिन आयुष्यात एक गोष्ट सर्वात महत्वाची असते ती म्हणजे वेळ. वेळ पाहण्यासाठी आपल्याला घड्याळाची गरज असते. घड्याळ म्हटलं की त्यात 1 ते 12 क्रमांक असतात हे तर आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला माहितीये का, जगात एक असं शहर आहे जिथे घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का?  

2/7

जगभरात जितकी शहरं आहेत तिथे कोणत्या ना कोणत्या चौक, बेल टॉवर किंवा चर्च येथे मोठं घड्याळ लावलेलं असतं. पण तुम्हाला ते शहर माहिती आहे का जेथील घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. याचं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.   

3/7

हे शहर जगातील सर्वात सुंदर देश स्वित्झर्लंडमध्ये आहे. या शहराचं नाव सोलोथर्न (Solothurn Of Switzerland) आहे. येथील लोक 11 क्रमांकासाठी इतके वेडे आहेत की त्यांनी घड्याळात 12 नंबरच ठेवलेला नाही.   

4/7

या शहरातील सर्व घड्याळं अशी आहेत, ज्यात फक्त 11 पर्यंत अंक आहेत. येथील चर्च आणि चॅपलमध्ये बसवलेल्या घड्याळांवरही 11 पर्यंतच अंक आहेत. या शहरात, टाऊन स्क्वेअरवर एक घड्याळ (A Clock on Town Square) बसवलेले आहे, जे शहराची ओळख देखील दर्शवते. पण तिथेदेखील 12 वाजत नाहीत. (Credit- Solothurn Tourism)  

5/7

खरं तर, इथल्या लोकांना 11 नंबर खूप आवडतो. येथील जुने धबधबे, म्युझियम आणि टॉवर यांचाही क्रमांक 11 आहे. 11 क्रमांकाचे महत्त्व सेंट उर्ससच्या मुख्य चर्चमध्ये (चर्च) देखील पाहिले जाऊ शकते. चर्च बांधण्यासाठी 11 वर्षे लागली. त्याला फक्त 11 दरवाजे आणि 11 खिडक्या आहेत. आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथले अनेक लोक 11 तारखेला वाढदिवसही साजरा करतात. लोकांना दिलेल्या भेटवस्तू देखील 11 शी संबंधित आहेत. (Credit- Solothurn Tourism)  

6/7

पण हे लोक 11 नंबरच्या मागे इतके वेडे का आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण शहरातील लोकांचं 11 वरील प्रेम आत्तापासूनचे नसून शतकानुशतके चालत आलेले आहे. यामागे एक लोककथा आहे. असं म्हणतात की सोलार्थन लोक खूप कष्ट करायचे, परंतु कठोर परिश्रम करूनही ते त्यांच्या आयुष्यात दुःखी होते.  

7/7

मग या शहराच्या डोंगरातून एक एल्फ आला. त्याने लोकांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद येऊ लागला. त्याच्यात अलौकिक शक्ती होती. जर्मन भाषेत एल्फ म्हणजे 11 असल्याने, सोलोथर्नच्या लोकांनी प्रत्येक कामाचा संबंध 11 शी जोडण्यास सुरुवात केली.