मॅक्सेवेलला Careless म्हणत थेट इगोवर भाष्य करणाऱ्या गावसकरांचा त्याच्या विक्रमी खेळीनंतर U-turn; आता म्हणतात, 'तो...'

भारताच्या यजमानपदात विश्वचषक 2023 जोशात चालू आहे. या वर्षी खेळाडुंकडून  बरेच विक्रमही मोडीत काढले जात आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल बद्दल केलेले एक विधान त्याने खोडून काढले आहे. 

Oct 26, 2023, 11:41 AM IST

भारताच्या यजमानपदात विश्वचषक 2023 जोशात चालू आहे. या वर्षी खेळाडुंकडून  बरेच विक्रमही मोडीत काढले जात आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल बद्दल केलेले एक विधान त्याने खोडून काढले आहे. 

1/7

गावस्करांनी मॅक्सवेलच्या खेळावर  केलेल्या बोचऱ्या टीकेचे  खेळ सुरू झाल्याच्या काही तासांतच कौतुकात रूपांतर झाले.   

2/7

ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स सामना सुरू व्हायच्या काही वेळापूर्वी मॅक्सवेलच्या खराब फॉर्म बद्दल टीकास्त्र सोडले होते. 

3/7

गावस्कर यांनी पाकिस्तानविरुद्ध मॅक्सवेलच्या शॉट निवडीवर विशेष टीका केली होती. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शाहीन शाह आफ्रिदीविरुद्ध वाइल्ड स्लोगचा प्रयत्न केल्यानंतर मॅक्सवेल गोल्डन डकवर बाद झाला होता. 

4/7

बॅटिंगसाठी मैदानात उतरण्यापूर्वी गावस्करांची ही टीका मॅक्सवेलने ऐकली की काय असेच म्हणावे लागेल, कारण त्यानंतर मॅक्सवेलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. 

5/7

त्याने 40 चेंडूत विश्वचषकातील सर्वात जलद शतक ठोकले. हे ऑस्ट्रेलियनचे वनडेतील सर्वात जलद शतक होते.

6/7

एका ODI च्या शेवटच्या दहा षटकात 100 पेक्षा जास्त धावा करणारा मॅक्सवेल हा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्याने त्याच्या खेळीत आठ षटकार मारले, जे अॅडम गिलख्रिस्ट आणि रिकी पाँटिंगसह विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियनकडून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार आहेत.

7/7

त्याने आणि पॅट कमिन्सने सातव्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली, जी विश्वचषकातील एका डावात संघासाठी सर्वाधिक आहे.