Garuda Purana : गरुड पुराणात लिहिलंय 'ही' लोकं कधीच स्वर्गात जाणार नाहीत!

Garuda Purana : मृत्यू आणि जन्म हा आपल्या हातात नसतो. पण मृत्यूनंतर आत्म्याला स्वर्गा की नरकात जागा मिळणार हे त्या व्यक्तीच्या कर्मावर असतं. गरुड पुराणात 271 अध्यायांपैकी 35 अध्यायात मृत्यूनंतर व्यक्तीला त्याचा कर्मानुसार काय मिळतं. शिवाय कोणत्या चुकीसाठी कोणाची शिक्षा होते याबद्दल सांगण्यात आलंय. 

| Dec 02, 2024, 17:55 PM IST
1/10

 गरुड पुराणाचा अधिपती हा भगवान विष्णू आहे. मानवाच्या मृत्यूनंतर नेमकं काय होतं, हे गरुड पुराणात सांगण्यात आलंय. मृत्यूनंतर सर्वात आधी आत्म्याला त्याच्या पापकर्मानुसार नरकात शिक्षा दिली जाते. 

2/10

एवढंच नाही तर, पुढच्या जन्मात मानवाच्या कर्मानुसार त्याच्या पुढच्या जन्माची वेळा आणि पुढील जन्मही गरुड पुराणात सांगण्यात आलाय. 

3/10

गरुड पुराणानुसार, जो कोणी निष्पाप जीवांची हत्या करतो किंवा आपल्या स्वार्थासाठी पशु-पक्ष्यांची हत्या करतात किंवा त्यांचा छळ करतो. त्यांना स्वर्ग नाही तर नरकात जागा मिळते. त्यानंतर त्याला गरम तेलात टाकलं जातं. तो त्याचा चांडालच्या रुपातील जन्म मानला जातो. 

4/10

चोरी करणारी, पैसे लुटून, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला नरकात यमराजाचे दूत दोरीने बांधून मारतात. ही लोक पुढच्या जन्मात कोल्हाळ, गिधाड, साप, गाढव आणि कांच या जातींमध्ये जन्माला येतात.

5/10

गरुड पुराणानुसार जे लोक मोठ्यांचा अपमान करतात किंवा त्रास देतात. अशा लोकांना नरकात भयंकर शिक्षा दिली जाते. अशा व्यक्तीची त्वचा उतरेपर्यंत नरकात बुडविलं जातं.

6/10

जे लोक महिलांवर बलात्कार करतात, शोषण करतात किंवा त्यांना फसवतात. गरुड पुराणानुसार अशा लोकांना नरकातील विष्ठा आणि मूत्राने भरलेल्या विहिरीत टाकलं जातं. तसंच त्यांचा पुढील जन्मही नपुंसक म्हणून जन्म मिळतो. 

7/10

जे लोक खोटे बोलतात त्यांना या नरकात पाठवलं जातं. यामध्ये आत्मा मोठ्या उंचीवरून खाली फेकला जातो. 

8/10

जे लोक विनाकारण झाडं तोडतात त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर या नरकात विजांनी मारलं जातं.

9/10

जी लोक व्याजाचा धंदा करतात आणि असहाय लोकांकडून व्याज वसूल करतात आणि त्यांना विंचूंनी भरलेल्या नरकात सोडलं जातं. 

10/10

गरुड पुराणानुसार एकूण 36 नरक असतात. यात तुमच्या कर्मानुसार त्या त्या नरकाची शिक्षा तुम्हाला दिली जाते. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)