राजकारणातील यारी जगात भारी! ठाकरे-पवार, अटल-आडवाणी, मोदी-शहांपासून ते केजरीवाल-सिसोदिंयांपर्यंत सर्वांच्या मैत्रीचे किस्से

Pravin Dabholkar | Aug 04, 2024, 12:20 PM IST
1/7

ठाकरे-पवार, अटल-आडवाणी, मोदी-शहांपासून ते केजरीवाल-सिसोदिंयांपर्यंत; राजकारणातील यारी जगात भारी!

Friendship Day 2024 Friends In Politics Modi Shah atala adawani Kejriwal Sisodia

Friendship Day 2024: भारतासहित जगभरात आज मैत्री दिवस साजरा केला जातोय. कठीण प्रसंगात धावून येणाऱ्याला मित्र म्हटलं जातं. राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन किंवा मित्र नसतो असे म्हणतात पण येथेच जिवलग मैत्री अनेकदा दिसून आली आहे. 

2/7

मोदी-शहांची मैत्री

Friendship Day 2024 Friends In Politics Modi Shah atala adawani Kejriwal Sisodia

मोदी शहांची मैत्री 1980 पासून आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्रीदेखील नव्हते तेव्हापासून ही मैत्री आहे. दोघे आरएसएसच्या मिटींगमध्ये भेटले होते. तेव्हा मोदी आरएसएसचे प्रचारक होते तर शहा संघ स्वयंसेवक होते. शाखेत खूप मित्र भेटतात. पण अशी मोदींशी घट्ट मैत्री झाल्याचे शहांनी एकदा सांगितले होते. 

3/7

बाळासाहेब ठाकरे- शरद पवार

Friendship Day 2024 Friends In Politics Modi Shah atala adawani Kejriwal Sisodia

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. बाळासाहेब हे माझे वैयक्तिक आयुष्यातील जवळचे मित्र आणि राजकीयदृष्ट्या मोठे विरोधक, असा उल्लेख पवारांनी याआधी केलाय. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि दोन मित्रांनी प्रत्येकी 5 हजार रुपये गोळा करून राजनीती नावाचं वर्तमान पत्र काढलं होतं.

4/7

वाजपेयी आणि आडवाणी

Friendship Day 2024 Friends In Politics Modi Shah atala adawani Kejriwal Sisodia

अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची मैत्री 1950 मध्ये झाली. दोघे भारतीय जनसंघात एकत्र होते. भाजपला वेगळ्या उंचीवर नेण्यास या दोघांचा मोठा वाटा आहे. इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या आणिबाणीला दोघांनी मिळून कडाडून विरोध केला.1999 ते 20004 पर्यंच वाजपेयी देशाचे पंतप्रधान तर आडवाणी गृहमंत्री होते. दोघे एकाच स्कूटरवर बसून पाणीपुरी खायला जायचे. पुस्तके वाचायचे. सिनेमा पाहायचे, असे किस्से सांगितले जातात. 

5/7

केजरीवाल आणि सिसोदिया

Friendship Day 2024 Friends In Politics Modi Shah atala adawani Kejriwal Sisodia

अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांच्यातील मैत्रीचे देशभरात उदाहरण दिले जाते. सिसोदिया पत्रकार तर केजरीवाल भारतीय राजस्व सेवा अधिकारी होते. केजरीवालांच्या एनजीओमध्ये दोघांची भेट झाली होती.यानंतर सिसोदियांनी नोकरी सोडून पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन संस्थेत रुजू झाले. 2011 मध्ये दोघे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णा हजारेंच्या सोबत जोडले गेले. यानंतर दोघांनी मिळून आम आदमी पार्टीची स्थापना केली. आता दोघांवरील दारु घोटाळ्यात आरोप झालेयत पण यांची मैत्री तुटली नाहीय.

6/7

लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार

Friendship Day 2024 Friends In Politics Modi Shah atala adawani Kejriwal Sisodia

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि आताचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची दोस्ती नेहमी चर्चेत राहिली आहे. राजकारणात अशीदेखील वेळ आली ती दोघे जिगरी मित्र ते कट्टर विरोध बनले. सध्या दोघांमध्ये मैत्री आहे. पण राजकारणातील मैत्री पलिकडची नाही. 

7/7

अमर सिंग आणि मुलायम

Friendship Day 2024 Friends In Politics Modi Shah atala adawani Kejriwal Sisodia

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि अमर सिंह यांच्यात घट्ट मैत्री होती. मुलायम सिंह यांनी त्यांना समाजवादी पार्टीचे महासचिव बनवले होते. एका विमान प्रवासात दोघांची भेट झाली होती. त्यावेळी मुलायम सिंह देशाचे संरक्षण मंत्री होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अमर सिंह आणि मुलायम सिंह यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला होता.