अल्लू अर्जुन विसरा, आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे मल्टीलिंगुअल स्टार! 6 भाषांमध्ये केलंय काम, ओळखलंत का?

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि मराठी चित्रपटसृष्टीचे अमिताभ बच्चन अशी ओळख असणाऱ्या सचिन खेडेकर यांचा आज वाढदिवस आहे. सचिन खेडेकर यांनी आजवर अनेक माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. इतकंच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये देखील काम केलं आहे. आज आपण त्यांच्याविषयी अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. 

Diksha Patil | May 14, 2024, 15:49 PM IST
1/7

सचिन खेडेकर

सचिन खेडेकर यांनी मराठी, हिंदी तेलगू, तमिळ, मल्याळम आणि गुजराती अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं आहे. सचिन यांचा आज 14 मे रोजी 59 वा वाढदिवस आहे. 

2/7

गाजलेले चित्रपट

सचिन खेडेकर हे त्यांच्या 'काकस्पर्श', 'अस्तित्व', 'श्याम बेनेगल', ‘नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो’ आणि ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखले जातात.   

3/7

लहानवयात वडिलांना गमावलं

सचिन खेडेकर हे 5 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना त्यांनी गमावलं. 

4/7

नाटकातून करिअरची सुरुवात

सचिन खेडेकर यांनी 1985 मध्ये नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांचं पहिलं नाटक हे विधीलिखीत होतं. त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये इम्तिहान या हिंदी मालिकेत काम केलं. 

5/7

'कोण होणार करोडपती'

'कोण होणार करोडपती' या मराठी शोमधून सचिन खेडेकर यांनी छोट्या पडद्यावर पुन्हा आले आहेत. त्याचे 

6/7

अल्लू अर्जुनसोबत केलय काम

अल्लू अर्जुनच्या अला वैकुंठपुररामुलू या दाक्षिणात्य चित्रपटात ते दिसले होते. 

7/7

प्रोजेक्ट्स

सचिन खेडेकर हे नुकतेच 'जुनं फर्निचर' या चित्रपटात दिसले. त्याशिवाय ते सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात दिसले. तर ते लवकरच जान्हवी कपूरच्या 'उलझा' या चित्रपटात दिसणार आहे.