Foods With Water: हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका, अन्यथा आरोग्याचे मोठे नुकसान

Drinking Water After A Meal:जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी अनेकदा सांगितले आहे, पण त्यामागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत, याचा कधी विचार केला आहे का?  

| Dec 11, 2022, 10:53 AM IST

Disadvantages Of Drinking Water After A Meal:जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी अनेकदा सांगितले आहे, पण त्यामागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत, याचा कधी विचार केला आहे का? खरं तर असे केल्याने पाचक रस पातळ होतात. पचनामध्ये समस्या येते. बहुतेक आरोग्य तज्ज्ञ जेवणानंतर अर्धा तास पाणी पिण्याचा सल्ला देतात. तसेच थंड पाणी पिण्याचेही टाळावे. असे अनेक खाद्यपदार्थ आहेत की, जेवल्यानंतर लगेच पाण्याचे पिऊ नये किंवा पाणी पिणयाचे टाळले  नाही तर आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते. असे कोणते पदार्थ आहेत की ते खाल्यानंतर पाणी पिण्याचे टाळले पाहिजे. ते जाणून घ्या.

1/5

ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणारे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव  (Ayushi Yadav) यांनी ZEE NEWS ला सांगितले की काही पदार्थ आणि पाणी यांचे मिश्रण तुमचे आरोग्य बिघडू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

2/5

मोसंबी, आवळा आणि गोड लिंब यांसारखी आंबट-गोड फळे  ( Citrus Fruits) खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. परंतु त्यानंतर पाणी प्यायल्याने पीएच संतुलन बिघडू शकते. त्यामुळे फळे पचनाबाबत समस्या निर्माण होते किंवा बाधा पोहोचते

3/5

केळी हे असे फळ आहे की, जे प्रत्येक ऋतूमध्ये खूप आवडीने खाल्ले जाते. ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, परंतु हे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा. अन्यथा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, तुम्ही किमान 30 मिनिटांपर्यंत थांबावे.  

4/5

कलिंगड हे एक उन्हाळी फळ आहे ज्यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते, ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पाचक रस पातळ होतात, त्यामुळे सूज ( ब्लोटिंग) याची समस्या येते.

5/5

दूध (Milk) हे संपूर्ण अन्न आहे यात शंका नाही, ज्यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळते. पण जर आपण दूध घेतल्यानंतर पाणी प्यायल्यानंतर पचनन शक्ती मंदावते. त्यामुळे आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होतो.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)