IND Vs Ban: ईशान किशनच्या डबल सेंच्युरीवर गर्लफ्रेंड फिदा, दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन

Ishan Kishan Double Century: चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज डबल सेंच्यूरी ठोकली. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. 

Dec 10, 2022, 23:52 PM IST

Ishan Kishan Double Century: बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा स्टार आणि युवा फलंदाज ईशान किशनने (ishan kishan) डबल सेंच्यूरी ठोकली होती. या सेंच्युरीमुळे टिम इंडियाने 400 धावांचा पल्ला गाठला होता. दरम्यान टीम इंडियाने 182 धावात बांगलादेशला गुंडाळत हा सामना 227 धावांनी जिंकला. 

1/7

ishan kishan

चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज डबल सेंच्यूरी ठोकली. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. 

2/7

ishan kishan

दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माच्या जागी आज ईशान किशन फलंदाजीला आला होता, आणि त्याने 126 चेंडूत द्विशतक झळकावले होते.

3/7

ishan kishan

ईशान किशनच्या या डबल सेंच्यूरीनंतर त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडियाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

4/7

ishan kishan

indiancricetteam या इंस्टाग्राम हँडलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये ईशान किशन 200 धावा करत असल्याचा फोटो होता आणि तीच पोस्ट ईशानच्या गर्लफ्रेंडने शेअर केली होती.

5/7

ishan kishan

ईशान किशनची गर्लफ्रेंड अदिती, एक मॉडेल आहे आणि तिने तिच्या कारकिर्दीत मिस दिवा 2018 सारखे अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

6/7

ishan kishan

मीडिया रिपोर्टनुसार अदिती आणि ईशान तीन वर्षांहून अधिक काळ डेट करत आहेत आणि अनेकदा त्यांच्या पोस्ट एकमेकांच्या इन्स्टाग्राम पेजवर दिसतात.

7/7

ishan kishan

अदिती अनेकदा IPL सामन्यांमध्ये देखील किशनला सपोर्ट करताना दिसली आहे. IPL 2019 चॅम्पियनशिपमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील सामन्यादरम्यान ती चर्चेत आली होती.